किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात, मी स्वागताला तयार!

किरीट सोमय्या येत्या 26 आणि 27 तारखेला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. तशी माहिती खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्याचबरोबर ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर होणार का? या प्रश्नावर पाटील यांनी माझ्या हसण्यावरुन समजून जा, अशा शब्दात संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करुन किरीट सोमय्यांना एकप्रकारे इशारा दिलाय.

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात, मी स्वागताला तयार!
सचिन सावंत, किरीट सोमय्या


मुंबई : महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे सध्या ईडी, सीबीआयसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या येत्या 26 आणि 27 तारखेला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. तशी माहिती खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्याचबरोबर ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर होणार का? या प्रश्नावर पाटील यांनी माझ्या हसण्यावरुन समजून जा, अशा शब्दात संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करुन किरीट सोमय्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. (Kirit Somaiya will visit Nanded on 26 October, Sachin Sawant said ready to welcome)

किरीट सोमय्या यांनी 21 ऑक्टोबरला ट्वीट करुन आपण 26 आणि 27 ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘सोमय्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण 26 ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये तुमचं स्वागत आहे’, असं ट्वीट केलंय.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. हा संवाद साधत असतानाच नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं. चंद्रकांतदादांनी हे विधान करताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांचा संपूर्ण रोख अशोक चव्हाणांकडे असल्याने चव्हाणांची चौकशी होणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खळबळ माजवण्याचा प्रयत्न – चव्हाण

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर अशोक चव्हाण यांची माध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याची खंत चव्हाण यांनी केली. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे. मात्र, यावर फारस भाष्य करणार नाही असे म्हणत हे सगळं राजकीय असल्याचे ते म्हणाले आहेत.

इतर बातम्या : 

‘देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा’, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ द्या’, संजय राऊतांचं मोदी, शाहांना आवाहन

Kirit Somaiya will visit Nanded on 26 October, Sachin Sawant said ready to welcome

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI