Sangamner Vidhan Sabha 2024 : संगमनेरमध्ये फक्त थोरात, थोरात आणि थोरातच…असं का? कोणीच त्यांना का हरवू शकत नाही?
Sangamner Vidhan Sabha 2024 : संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात असं मागच्या 40 वर्षांपासून समीकरण आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना हरवणं खूप कठीण आहे, असं म्हटलं जातं. पण असं का?. आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रात संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. युती-आघाडीमध्ये काही जागांवर अजूनही पेच आहे. पण तो लवकरच सुटेल. 29 ऑक्टोंबर 2024 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगत येईल. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होत असताना एक विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे संगमनेर. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ येतो. संगमनेरच नाव निघालं किंवा राजकीय चर्चा सुरु झाली की, सर्वप्रथम नाव येतं, ते बाळासाहेब थोरातांच. संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात हे मागच्या 40 वर्षांपासूनच चालत आलेलं राजकीय समीकरण आहे. आज संगमनेर चर्चेत येण्यामागच कारण आहे, ते म्हणजे जयश्री थोरात यांच्याबद्दल झालेलं वादग्रस्त वक्तव्य. जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. जयश्री थोरात यांच्याविषयी भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य तसच संगमनेर विधानसभा ...
