36 आमदारांचा पत्ता कट करुन दुसऱ्यांना तिकीट, यंदाचा निकाल काय?

यंदा भाजपने 22, तर शिवसेनेने 8 विद्यमान आमदारांना घरी बसवलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 3 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (Maharashtra assembly election result 2019) केला.

36 आमदारांचा पत्ता कट करुन दुसऱ्यांना तिकीट, यंदाचा निकाल काय?
Follow us
| Updated on: Oct 25, 2019 | 2:13 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विधानसभा निकालात सर्वात जास्त जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसला 44 जागा (Maharashtra assembly election result 2019) मिळाल्या. तर शिवसेना-भाजप युतीला 161 तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 98 जागा मिळाल्या. या निकालामुळे पंकजा मुंडे, राम शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर यासह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा (Maharashtra assembly election result 2019) लागला.

या निवडणुकांपूर्वी उमेदवारांना तिकीट देताना जवळपास 36 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले. त्या ठिकाणी नवी चेहऱ्यांना संधी देत प्रस्थापितांना डावलण्यात आला होता. तर काही ठिकाणी उमेदवारांच्या सुमार कामगिरीमुळे काहींचा पत्ता कट करण्यात आला होता. यंदा भाजपने 22, तर शिवसेनेने 8 विद्यमान आमदारांना घरी बसवलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 3 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (Maharashtra assembly election result 2019) केला.

यात भाजपला 22 पैकी 8 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. 12 जागांवर भाजपचा विजयी झाली. तर यातील एका जागेवर शिवसेनेचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेना 8 पैकी 4 जागांवर पराभूत झाली आहे. 3 जागांवर शिवसेना तर एका जागेवर भाजप विजयी झाली (Maharashtra assembly election result 2019) आहे.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला होता. यात काँग्रेसने तिन्ही जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला (Maharashtra assembly election result 2019) आहे.

पत्ता कट झालेल्या विद्यमान आमदार

भाजप – 22 पैकी 8 जागांवर पराभूत, 12 जागांवर भाजप विजयी, तर एका जागेवर शिवसेना विजयी

शहादा, नंदुरबार – उदेसिंह पाडवी (भाजप) – काँग्रेसच्या तिकीटावर – विजयकुमार गावित (भाजप विजयी)

चाळीसगाव, जळगाव – उन्मेष पाटील (भाजप) –  मंगेश चव्हाण (भाजप विजयी)

मुक्ताईनगर, जळगाव – एकनाथ खडसे (भाजप) – मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट – चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी) भाजप पराभूत

मेळघाट, अमरावती – प्रभूदास भिलावेकर (भाजप) तिकीट डावलून रमेश मावस्कर (भाजप) – राजकुमार पटेल (इतर) भाजप पराभूत

नागपूर दक्षिण, नागपूर – सुधाकर कोठले (भाजप) – मोहन माटे (भाजप विजयी)

कामठी, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) तिकीट डावलून टेकचंद सावरकर (भाजप) – सुरेश भोयर (काँग्रेस) भाजप पराभूत

तुमसर, भंडारा – चरण वाघमारे (भाजप) तिकीट डावलून प्रदीप पडोळे (भाजप) – राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी) भाजप पराभूत

भंडारा, भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप) तिकीट डावलून अरविंद भालंदरे (भाजप) –  नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) भाजप पराभूत

साकोली, भंडारा – बाळा काशिवार (भाजप) तिकीट डावलून परिणय फुके (भाजप) – नाना पटोले (काँग्रेस) भाजप पराभूत

आर्णी, यवतमाळ – राजू तोडसाम (भाजप) तिकीट डावलून संदीप धुर्वे (भाजप) – संदीप धुर्वे (भाजप विजयी)

उमरखेड, यवतमाळ – राजेंद्र नजरधने (भाजप) तिकीट डावलून राजेंद्र नजरधने (भाजप) –  नामदेव ससाणे (भाजप विजयी)

विक्रमगड, पालघर – विष्णू सावरा (भाजप) – मुलगा हेमंत सावरा यांना तिकीट – सुनिल भुसारा (राष्ट्रवादी) भाजप पराभूत

कल्याण पश्चिम, ठाणे – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप) – शिवसेनेकडून विश्वनाथ भोईर (शिवसेना) –  विश्वनाथ भोईर (शिवसेना) भाजप पराभूत

बोरीवली, मुंबई-  विनोद तावडे (भाजप) तिकीट डावलून सुनिल राणे (भाजप) – सुनिल राणे (भाजप विजयी)

घाटकोपर पूर्व, मुंबई – प्रकाश मेहता (भाजप) तिकीट डावलून पराग शाह (भाजप) – पराग शाह (भाजप विजयी)

कुलाबा, मुंबई – राज पुरोहित (भाजप) तिकीट डावलून राहुल नार्वेकर (भाजप) – राहुल नार्वेकर (भाजप विजयी)

शिवाजीनगर, पुणे – विजय काळे (भाजप) तिकीट डावलून सिद्धार्थ शिरोळे (भाजप) – सिद्धार्थ शिरोळे (भाजप विजयी)

कोथरुड, पुणे – मेधा कुलकर्णी (भाजप) तिकीट डावलून चंद्रकांत पाटील (भाजप) – चंद्रकांत पाटील (भाजप विजयी)

माजलगाव, बीड – आर. टी. देशमुख (भाजप) तिकीट डावलून रमेश आडासकर (भाजप) – प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी) भाजप पराभूत

केज, बीड – संगिता ठोंबरे (भाजप) – आयात नमिता मुंदडा यांना तिकीट नमिता मुंदडा

उदगीर, लातूर सुधाकर भालेराव (भाजप) तिकीट डावलून अनिल कांबळे (भाजप) – संजय बनसोडे (राष्ट्रवादी) भाजप पराभूत

शिवसेना – 08

शिवसेना – 08 पैकी 4 जागांवर पराभूत, 3 जागांवर शिवसेना तर एका जागेवर भाजप विजयी

चोपडा, जळगाव – चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) ऐवजी पत्नी लता सोनावणे – लता सोनावणे (शिवसेना विजयी)

नांदेड दक्षिण, नांदेड – हेमंत पाटील (शिवसेना)  तिकीट डावलून राजश्री पाटील (शिवसेना) – मोहन हंबर्डे (काँग्रेस) शिवसेना पराभूत

पालघर, पालघर – अमित घोडा (शिवसेना) तिकीट डावलून श्रीनिवास वनगा (शिवसेना) – श्रीनिवास वनगा (शिवसेना विजयी)

कल्याण ग्रामीण, ठाणे – सुभाष भोईर (शिवसेना) तिकीट डावलून रमेश म्हात्रे (शिवसेना) – प्रमोद (राजू) पाटील (मनसे) शिवसेना पराभूत

भांडुप पश्चिम, मुंबई – अशोक पाटील (शिवसेना) भाजपकडून महेश प्रभाकर चौगुले (भाजप) – महेश प्रभाकर चौगुले (भाजप) शिवसेना पराभूत

वांद्रे पूर्व, मुंबई – तृप्ती सावंत (शिवसेना) – महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट सावंत यांची अपक्ष बंडखोरी – झिशान सिद्दीकी (काँग्रेस) शिवसेना पराभूत

वरळी, मुंबई – सुनिल शिंदे (शिवसेना) – आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी – आदित्य ठाकरे (शिवसेना विजयी)

करमाळा, सोलापूर – नारायण पाटील (शिवसेना) – आयात रश्मी बागल यांना तिकीट – संजय शिंदे (अपक्ष) (शिवसेना पराभूत)

पत्ता कट झालेले महाआघाडीचे आमदार (Sitting MLAs Candidature Rejected)

काँग्रेस तिन्ही जागांवर विजय

नवापूर, नंदुरबार – सुरुपसिंग नाईक (काँग्रेस) तिकीट कापून शिरीष नाईक (काँग्रेस) – शिरीष नाईक (काँग्रेस विजयी)

भोकर, नांदेड – अमिता चव्हाण (काँग्रेस) – पती अशोक चव्हाण यांना तिकीट – अशोक चव्हाण (काँग्रेस विजयी)

लातूर ग्रामीण, लातूर – त्र्यंबक भिसे (काँग्रेस) – धीरज देशमुख यांना तिकीट – धीरज देशमुख (काँग्रेस विजयी)

राष्ट्रवादी तिघांमधील एका जागेवर पराभूत

पुसद, यवतमाळ – मनोहर नाईक (राष्ट्रवादी) – मुलगा इंद्रनिल मनोहर नाईक यांना तिकीट – इंद्रनिल मनोहर नाईक ( राष्ट्रवादी विजयी)

श्रीगोंदा, अहमदनगर – राहुल जगताप (राष्ट्रवादी) तिकीट घनश्याम शेलार यांना तिकीट – बबनराव पाचपुते (भाजप) राष्ट्रवादी पराभूत

चंदगड, कोल्हापूर – संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी) तिकीट डावलून राजेश पाटील यांना तिकीट – राजेश पाटील (राष्ट्रवादी विजयी)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.