सिंधुदुर्ग : राज्यातील महापुरानंतर आता मदतीवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 701 कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. मात्र, सध्यस्थितीतील महापुरामुळे झालेल्या नुकसानाबाबत अद्याप पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही. यावरुन काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर टीका केलीय. वडेट्टीवार यांच्या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. (Nitesh Rane criticizes Vijay Vadettiwar for helping flood victims)