सत्तास्थापनेची दिल्लीत खलबतं, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Namrata Patil

|

Updated on: Nov 19, 2019 | 7:50 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली आहे.

सत्तास्थापनेची दिल्लीत खलबतं, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली आहे. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली (Sanjay raut meet Sharad Pawar) जात आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी संजय राऊत या दोघांची भेट झाली. यावेळी राऊत आणि पवारांमध्ये 10 मिनिटे चर्चा (Sanjay raut meet Sharad Pawar) झाली.

उद्या (20 नोव्हेंबर) राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत शरद पवारांची भेट झाली. त्यापूर्वी आज (19 नोव्हेंबर) दुपारी संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच आज रात्रीपर्यंत संजय राऊत काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Sanjay raut meet Sharad Pawar) आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. दरम्यान काल (18 नोव्हेंबर) संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. “राज्यात राष्ट्रपती राजवट लवकर दूर व्हावी यावर आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल याबाबत मी खात्रीने बोलू शकतो.” असे संजय राऊत पवारांच्या भेटीनंतर बोलले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay raut meet Sharad Pawar) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनतंर संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.

तर दुसरीकडे सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे (Shiv Sena urges Congress) केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. दिल्लीत बुधवारी  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Shiv Sena urges Congress) नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

शिवसेना पुन्हा कोंडीत, पाठिंब्याबाबत शरद पवार- सोनिया गांधींमध्ये चर्चाच नाही! 

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI