शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी

पुण्यात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत (NCP- Shivsena-Congress Banner in pune) आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो, पुण्यात बॅनरबाजी
Namrata Patil

|

Nov 09, 2019 | 9:07 AM

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला (NCP- Shivsena-Congress Banner in pune) आहे. सद्यस्थिती सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागलं आहे. तर दुसरीकडे पुण्यात सत्ता स्थापनेवरुन बॅनरबाजी सुरु झाली आहे. पुण्यात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोललं (NCP- Shivsena-Congress Banner in pune) जात आहे.

पुण्यातील कोंढावा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या तिन्ही नेत्यांचे एकत्र फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेन, धनुष्यातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा… असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला (NCP- Shivsena-Congress Banner in pune) आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच प्रसंग कायम असताना अशाप्रकारचे बॅनर लागल्याने पुण्यात चर्चांना उधाण आले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान निवडणूक निकालानंतर राज्यात 16 दिवसांपासून सत्ता स्थापनेवरुन सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात कुणाचा मुख्यमंत्री बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला (NCP- Shivsena-Congress Banner in pune) आहे.

त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र आजच्या एकूण राजकीय घडामोडीवरुन शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं वाटत नाहीये. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करणार का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें