रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहेत.

रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित?
Follow us
| Updated on: Nov 22, 2019 | 12:30 AM

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडताना दिसत (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (21 नोव्हेंबर) दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार (Uddhav thackeray meets sharad pawar home) पडली. यानंतर आज रात्री 11.15 च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Uddhav thackeray meets sharad pawar home) घेतली. जवळपास 1 तास 10 मिनिटानंतर ही बैठक संपली. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानही ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे उद्या (22 नोव्हेंबर) शरद पवार यांना भेटणार होते. मात्र आज रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीहून बाहेर पडले. तर दुसरीकडे शरद पवारही दिल्लीतून मुंबईतील निवासस्थानी दाखल होताच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास 1 तास 10 मिनिटे ही बैठक झाली. या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटायला जाण्यापूर्वी रात्री 8:30 च्या सुमारास दोघांचे फोनवर जवळपास 15 मिनिटे बोलणे झाल्याचेही बोललं जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सिल्व्हर ओक येथे भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थितीत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीनंतर आज रात्रीच सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, मंत्रिपद, महत्त्वाची खाती, महामंडळे यावर चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. तसेच संध्याकाळी 4च्या सुमारास काँग्रेसच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडला (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) जाईल.

मुंबईत बैठकांचा सपाटा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 23 नोव्हेंबरला महासेनाआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणूगोपाल मुंबईत येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हे दोन्ही नेते मुंबईत येणार असल्याचे बोललं जातं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एकत्रित बैठकीत शिवसेनेशी थेट चर्चा करण्यासाठी दोघांनाही पाठवणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत बैठकांचा सपाटा पाहायला मिळणार (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे.

दिल्लीत बैठकांचे सत्र

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) दिली.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात एकमत आहे. त्यानंतर उद्या (22 नोव्हेंबर) आम्ही मुंबईत जाऊन आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करु. या चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा करु,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

संबंधित बातम्या : 

काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज चव्हाण

महाआघाडीची गाडी सुसाट, आता ब्रेक नाही : संजय राऊत

महासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे?

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.