AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेस प्रयत्नशील, महाविकास आघाडीची रणनीती काय?

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे (Maharashtra Legislative Council election 2020).

विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेस प्रयत्नशील, महाविकास आघाडीची रणनीती काय?
विधानसभा अध्यक्ष
| Updated on: May 05, 2020 | 5:35 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आणीबाणी सुरु आहे. त्याचवेळी दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे (Maharashtra Legislative Council election 2020). या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही भविष्य निश्चित होणार आहे. महाविकासआघाडीने याच पार्श्वभूमीवर आज (5 मे) सायंकाळी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यात आघाडीकडून विधान परिषदेच्या 6 जागा निवडून आणण्याबाबत रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे. 21 मे रोजी राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता आघाडीला 5 जागा सहजपणे जिंकता येणार आहे. मात्र, काँग्रेस 6 व्या जागेसाठी आग्रही असल्याने आघाडीकडून देखील जोर लावला जाण्याची शक्यता आहे. याप्रमाणे आघाडीली प्रमुख तीन पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांची वाटणी होऊ शकते. यावरच आजच्या बैठकीत निर्णय होईल. भाजपकडील संख्याबळ पाहता त्यांना 3 जागा सहज जिंकता येणार आहे. मात्र, त्यांनी देखील चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीला 5 जागा सहज जिंकता येणार आहेत. मात्र, अपक्षांना एकत्र करता आलं तर सहाव्या जागेवर देखील महाविकास आघाडी दावा करु शकेल. आघाडीचा एकूणच हाच प्रयत्न असून 6 जागा लढवण्यासाठी काँग्रेसही आग्रही आहे. भाजपकडे असलेल्या संख्याबळानुसार भाजप 3 जागा सहज निवडून आणू शकणार असला तरी त्यांच्याकडूनही चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु आहे. भाजपला चौथी जागा जिंकण्यासाठी अपक्षांचीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच सहाव्या जागेवर कुणाचा उमेदवार निवडून येणार हे अपक्ष आमदारच ठरवणार असल्याचं चित्र आहे.

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकांवर बोलताना सांगितलं, “विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध पार पाडाव्यात ही भाजपची भूमिका आहे. भाजप 4 जागा लढवणार आहे. आम्ही 4 जागा सहजरित्या निवडून आणू. महाविकास आघाडीने पाच जागा लढवाव्यात. खुद्द मुख्यमंत्री ही निवडणूक लढवत असल्यामुळे या निवणुकीचा मान गरीमा राखली जावी, अशी आमची भूमिका आहे. शेवटी किती जागा लढवायच्या हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या संकटात बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीने 6 वी जागा लढवल्यास नाईलाजाने निवडणूक घ्यावी लागेल.

विधान परिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली आहे (Maharashtra legislative council polls).

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

संबंधित बातम्या :

Vidhan Parishad Election | भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी, आठवलेंचं फडणवीस-चंद्रकांतदादांना पत्र

Vidhan Parishad Election | शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित, उद्धव ठाकरेंसह दुसरा उमेदवारही ठरला

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

विधानपरिषदेच्या तिकीटासाठी मोर्चेबांधणी सुरु, विदर्भातील काँग्रेस इच्छुक नेत्यांच्या भेटीला

काहींचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं, आता झालं गेलं विसरुन बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न : जयंत पाटील

Maharashtra Legislative Council election 2020

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.