AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde Hospitalised : धनंजय मुंडेंना तीव्र पोटदुखी, लीलावती रुग्णालयात दाखल

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Dhananjay Munde Admitted In Lilavati Hospital)

Dhananjay Munde Hospitalised : धनंजय मुंडेंना तीव्र पोटदुखी, लीलावती रुग्णालयात दाखल
| Updated on: Nov 10, 2020 | 4:21 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे. (Dhananjay Munde Admitted In Lilavati Hospital)

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असे ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडेंना कोरोना

दरम्यान धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर अकरा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते 14 दिवस होम क्वारंटाईन होते.

रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली होती.

दरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.

धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपल्या समर्थकांना उपास-तापास, नवस न करण्याचे आवाहन केले होते. (Dhananjay Munde Admitted In Lilavati Hospital)

संबंधित बातम्या : 

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.