नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही, अनिल परब यांचा मनसेवर घणाघात

नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही, अनिल परब यांचा मनसेवर घणाघात

मनसेच्या बदलेल्या नव्या भूमिकेवर शिवसेनेनी जोरदार प्रहार केला. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल परब यांनी मनसेला टार्गेट केलं.

Nupur Chilkulwar

| Edited By: Namrata Patil

Jan 27, 2020 | 9:45 AM

रत्नागिरी : मनसेच्या बदलेल्या नव्या भूमिकेवर शिवसेनेनी जोरदार प्रहार केला (Shivsena). परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल परब यांनी मनसेला टार्गेट केलं. मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचं काय झालं. बाळासाहेबांनी हिंदुंसाठी जो त्याग केला, तसं योगदान दुसऱ्याने कोणी दिलं का, असा प्रतिसवाल मनसेला केला. तसेच, “नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही. झेंडा घेतला म्हणून हिंदूंची मत फिरत नाही, असं सांगत अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला (Anil Parab Criticise MNS).

कायदा सुव्यस्थेवर नारायण राणेंनी न बोललेलंच बरं : अनिल परब

नाईट लाईफ हा बालहट्ट म्हणून महाविकास आघाडीला चिमटे काढणाऱ्या नारायण राणेंनाही शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं. “राणेंनी किमान कायदा सुवस्थेवर तरी बोलू नये, नाईट लाईफ संकल्पना नेमकी समजून घ्या”, असा टोला अनिल परब यांनी नारायण राणेंना लगावला.

“कायदा सुव्यस्थेवर नारायण राणेंनी न बोललेलंच बरं. राणे काय बोलतात ह्यापेक्षा सरकार काय बोलतं, हे महत्वाचं आहे”, असं अनिल परब यांनी सष्ट केलं.

भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न : अनिल परब

2024 मध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार, देवेंद्र फडवणवीस यांच्या विधानाला परब यांनी प्रत्युत्तर दिलं. “त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न, त्याबाबत मी का बोलावं. पण लढाई ही लढाई आहे, लढाई ही लढाईसारखीच बघावी लागते. त्यामुळे 2024 ला जो कोणी आमच्या समोर आहे, त्याच्या विरोधात आम्ही लढणार”, असंही अनिल परब यांनी सष्ट केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें