AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोका आहे का भाजपने ठरवावं, मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच, पक्षप्रवेशानंतर आमदार गीता जैन यांचा एल्गार

मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. ते शिवसेनेत प्रवेश करतील. पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, अशी खात्री गीता जैन यांनी व्यक्त केली.

धोका आहे का भाजपने ठरवावं, मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच, पक्षप्रवेशानंतर आमदार गीता जैन यांचा एल्गार
| Updated on: Oct 24, 2020 | 3:22 PM
Share

मुंबई : मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा एल्गार आमदार गीता जैन यांनी शिवसेना प्रवेशानंतर केला. तर मिरा भाईंदर महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा विश्वास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain joins Shivsena)

“माझ्या प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही, ते भाजपने ठरवावं. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकासकामाच्या आश्वासनामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. बंडखोर म्हणून मी निवडून आले, पण मी भाजपला समर्थन दिलं होतं. परंतु पक्षश्रेष्ठींकडून वचनपूर्तता झाली नाही, अशी खंत गीता जैन यांनी व्यक्त केली. मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. वेळ आल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करतील. पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

“मिरा भाईंदरमध्ये एकहाती सत्ता”

मिरा भाईंदर पालिकेचं समीकरण येत्या काळात बदलताना पाहायला मिळणार आहे. येत्या काळात महापालिका निवडणुकीत मिरा भाईंदरमध्ये आमची एकहाती सत्ता येईल. भाजप नगरसेवक मोठ्या प्रमाणात आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला.

“पक्षवाढीसाठी आणखी बळ मिळेल”

मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद 22 नगरसेवकांची आहे. गीता जैन यांच्या प्रवेशामुळे पक्षवाढीसाठी आणखी बळ मिळेल. भाजपला काय फटका बसतो, हे पुढच्या काळात पाहायला मिळेल, असे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गीता जैन विरुद्ध नरेंद्र मेहता वाद

भाजपच्या सहयोगी राहिलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा जैन यांनी पराभव केला होता. मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपात दोन गट पडले आहेत. यामध्ये एक गट विद्यमान आमदार गीता जैन यांचा, तर दुसरा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा आहे. जैन आणि मेहता यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain joins Shivsena)

मिरा भाईंदर महापालिकेत आता भाजपची सत्ता आहे. भाजपचेच महापौर असून पक्षाचे 61 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. पालिकेत सत्तेसाठी 48 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपचे 61 नगरसेवक असल्यामुळे दहा नगरसेवक आमदार गीता जैन यांच्यासोबत गेले, तरीही भाजपच्या सत्तेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.

सध्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर आहेत. यानंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मिरा भाईंदरमध्ये जैन समाजाची संख्या जास्त असल्याने येणाऱ्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते.

गीता जैन यांची नाराजी

अपक्ष निवडणूक जिंकल्यावर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मिरा भाईंदरच्या ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन

(Mira Bhainder Independent MLA Geeta Jain joins Shivsena)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.