AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत वार्ड पुनर्रचनेचा वाद पेटण्याची शक्यता; मतदारांची नावे गायब करण्याचा प्रयत्न सुरु, भाजपचा आरोप

पालिका आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने वार्ड पुनर्रचना अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल वेगळा होता. तर चहल यांनी पाठवलेल्या अहवालात फरक आहे. महापालिका अधिकारी आणि आयुक्तांच्या लॅपटॉपचे ऑडिट करण्यात यावे म्हणजे सर्व सत्य समोर येईल, अशी मागणी साटम यांनी केलीय.

मुंबईत वार्ड पुनर्रचनेचा वाद पेटण्याची शक्यता; मतदारांची नावे गायब करण्याचा प्रयत्न सुरु, भाजपचा आरोप
इक्बाल चहल, अमित साटम
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 1:37 PM
Share

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रभाग रचनेतील बदलामुळे मुंबईत राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय. मतदारांची नावं गायब करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. तसंच महापालिका आयुक्तांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (MLA Amit Satam accuses Shivsena and Municipal Commissioner on BMC ward restructuring issue)

पालिका आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने वार्ड पुनर्रचना अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल वेगळा होता. तर चहल यांनी पाठवलेल्या अहवालात फरक आहे. महापालिका अधिकारी आणि आयुक्तांच्या लॅपटॉपचे ऑडिट करण्यात यावे म्हणजे सर्व सत्य समोर येईल, अशी मागणी साटम यांनी केलीय. मतदारांनी नावं गायब करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आयुक्तांवर कारवाईची मागणी आमदार साटम यांनी केलीय.

मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचा भाजपचा आरोप

तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले. तसंच लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत फेरफार केला. त्याद्वारे मुंबईकरांची फसवणूक केली असा आरोप भाजपनं केलाय. या प्रभाग रचनेचा निषेध म्हणून आज भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखं गांधीगिरी आंदोलन केलं.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आली आहे. ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसंच पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपनं केलाय.

भाजपचं आंदोलन आणि न्यायालयात जाण्याचा इशारा

नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली आहे. भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच ही प्रभाग रचना केली असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी मागणी भाजपने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.

इतर बातम्या :

’25 वर्षे आम्ही नको ती अंडी उबवली’, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला; निलेश राणे म्हणतात, ‘युती बाळासाहेबांनी जपली, उद्धव ठाकरेंनी नाही’

‘अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा’, किरीट सोमय्यांकडून हल्लाबोल सुरुच

MLA Amit Satam accuses Shivsena and Municipal Commissioner on BMC ward restructuring issue

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.