AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu: ‘मी तर बच्चू’, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही, मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या बच्चू कडूंचा ‘युटर्न’

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही. तो विषय हा वेगळा आहे. आम्ही तर केवळ जनतेचे सेवक आहोत. आमदार असो की मंत्री जनतेची सेवा ही महत्वाची आहे असे म्हणणारे बच्चू कडू हे यापूर्वी मंत्रिपदासाठी किती इच्छूक होते ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना याबाबत बोलणे उचित ठरणार नाही. त्यामुळे आमदार आता सावध पवित्रा घेत आहे.

Bachchu Kadu: 'मी तर बच्चू', मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही, मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या बच्चू कडूंचा 'युटर्न'
आ. बच्चू कडू
| Updated on: Aug 06, 2022 | 2:53 PM
Share

मुंबई : राज्यातील (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुशंगाने राजधानी दिल्लीमध्ये मोठी खलबते होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासर राज्यपाल देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळाची यादीच (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री हे राज्यात परतरणार की काय ? असे चित्र निर्माण झाले आहे. आता विस्तार एवढ्या तोंडावर आलेला असताना आपण अधिकचे बोलून काही विपरीत घडू नये अशीच भूमिका आमदार हे घेऊ लागले आहेत. यापूर्वी मंत्रिमंडळाबाबत (Bacchu kadu) आ. बच्चू कडू यांना विचारणा झाली असता ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडेल असे खाते मिळाले तर काम चांगले करता येईल अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. आता मात्र ते देखील साववध प्रतिक्रिया देत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना त्यांना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले तेव्हा मी तर अजून बच्चू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलण्याइतका मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सुरवातीला इच्छूक असलेल्या कडूंचा मंत्रिमंडळात समावेश होतो का नाही हे पहावे लागणार आहे.

मी तर केवळ जनतेचा सेवक

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही. तो विषय हा वेगळा आहे. आम्ही तर केवळ जनतेचे सेवक आहोत. आमदार असो की मंत्री जनतेची सेवा ही महत्वाची आहे असे म्हणणारे बच्चू कडू हे यापूर्वी मंत्रिपदासाठी किती इच्छूक होते ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना याबाबत बोलणे उचित ठरणार नाही. त्यामुळे आमदार आता सावध पवित्रा घेत आहे. यावर बच्चू कडू यांनी तर आपण अजून बच्चू असून यावर बोलण्याइतके मोठे नसल्याचे सांगितले आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुशंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढेच नाहीतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्ली वारीवर गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात कशाला त्यापेक्षाही आगोदर विस्तार होईल शिवाय यामध्ये कोणत्याही अडचणी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का हे पहावे लागणार आहे.

भाजपाची यादी तयार

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपाची यादी तयार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येंकालाच संधी मिळेल असे नाही. हे देखील स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठी हे तरुण चेहऱ्यांना पसंती देणार असल्याचे सांगण्यात आले होते. असे असताना देखील भाजपाची यादी फायनल असून शिंदे गट आणि भाजप यामधील वाटाघाटीमुळे विस्तार रखडल्याची चर्चा होती.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.