संदीप देशपांडे 14 दिवस कोठडीत, आता मनसेचा दुसरा नेताही पोलिसांच्या ताब्यात

वांद्रे विभागाध्यक्ष अखिल चित्रे यांनी पदपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं (MNS Akhil chitre on unauthorized peddlers in footpath) आहे.

संदीप देशपांडे 14 दिवस कोठडीत, आता मनसेचा दुसरा नेताही पोलिसांच्या ताब्यात


वांद्रे : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मनसेचे विविध नेते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले (MNS Akhil chitre on unauthorized peddlers in footpath)  आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली मनसे नेते संदीप देशपांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यानतंर आज वांद्रे विभागाध्यक्ष अखिल चित्रे यांनी पदपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं (MNS Akhil chitre on unauthorized peddlers in footpath) आहे.

वांद्रे विधानसभा मतदारसंघातून अखिल चित्रे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी मतदारांना पदपाथ फेरीवाला मुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर त्यांनी आज (2 नोव्हेंबर) आक्रमक पाऊल उचलत वांद्र्यातील पदपाथवरील फेरीवाल्यांना हटवले. याबाबतचा एक व्हिडीओही चित्रे यांनी फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलं आहे.

“आमदार झालो नाही म्हणून थांबणार नाही, दिलेला शब्द पाळणार पदपाथ फेरीवाला मुक्त करणार”, असे त्यांनी फेसबुक व्हिडीओच्या कॅप्शनवर म्हटलं आहे. त्यांच्या या धडक कारवाईनंतर वाकोला पोलिसांनी ताब्यात (MNS Akhil chitre on unauthorized peddlers in footpath) घेतले.

तर दुसरीकडे मनसेचे दहिसरमधील विभाग अध्यक्ष नयन कदम यांनी टोलनाक्यावर धडक दिली. दहिसर टोल नाका टोलमुक्त करावा या मागणीसाठी नयन कदम यांनी टोलनाक्यावर धडक दिली.

दरम्यान काल (1 नोव्हेंबर) दादर-माहिम परिसरातील मनसेने दिवाळीनिमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली होती. महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं. (Sandeep Deshpande Arrest). सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर आहे.

यानंतर संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून 14 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर संदीप देशपांडे, अखिल चित्रे, नयन कदम यांसह मनसेचे अनेक नेते पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या : 

मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

आधी संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला, आता राष्ट्रवादीचा आमदार राज ठाकरेंच्या घरी!

शरद पवारांच्या कार्यपद्धतीने प्रभावित, संदीप देशपांडे ‘सिल्व्हर ओक’वर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI