नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ‘कमबॅक’

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जाणार असल्याने मनसेचा विस्तार ग्रामीण भागात करण्यावर त्यांचा भर असेल. नाशिक हा एकेकाळचा मनसेचा […]

नाशिकमध्ये राज ठाकरेंचं 'कमबॅक'

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जाणार असल्याने मनसेचा विस्तार ग्रामीण भागात करण्यावर त्यांचा भर असेल.

नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला.. नाशिककरांनी राज ठाकरे यांना भरभरून प्रतिसाद देत तब्बल 40 नगरसेवक आणि तीन आमदार निवडून दिले. मात्र मधल्या काळामध्ये मोदी लाटेत मनसेचा नाशिकमध्ये धुव्वा उडाला. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये तर मनसेला 40 वरून थेट पाच नगरसेवकांतपर्यंत खाली यावं लागलं. अशातच राज ठाकरे यांचा करिष्मा ओसरतो की काय असं वाटायला लागलं.. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाले आणि राज ठाकरे यांनीही अचूक संधी साधत नाशिकचा दौरा आयोजित केला.

राज ठाकरे आणि नाशिककरांचं वेगळंच नातं आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांना नाशिकबद्दल आपुलकी आहे. मनसेची सत्ता हातात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शहरात अनेक विकासकामं केली. मात्र सत्तापालट झाल्यानंतर मनसेच्या या कामांना बंद करण्याचा जणू चंगच भाजपने बांधला. त्यामुळेच आपल्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे सत्ताधारी भाजपवर तुटून पडणार अशी चिन्हं आहेत.

एकूणच राज ठाकरे यांच्या या चार दिवसांच्या दौऱ्याकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे सध्या बॅकफूटवर असले तरी ते फार काळ बॅकफूटवर राहतील असं नाही. त्यामुळे देशात बदललेली हवा राज ठाकरे नाशिकमध्ये बदलू शकतात का याकडे मनसे कार्यकर्त्यांचं आणि नाशिककरांचं लक्ष लागलंय.

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नुकताच त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ दौरा केला. आता खान्देशातही मनसेचं संघटन मजबूत करण्यावर ते भर देण्याचा प्रयत्न करत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI