AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जयश्री थोरातांसंदर्भात भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य, संजय राऊत बोलले, की…

Sanjay Raut : "महाराष्ट्रात येऊन बाबाजी काय करतील?. बाबाजी प्रत्येक ठिकाणी जातात. बाबाजी आपल्या स्वतःच्या उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पार्टीला वाचवू शकले नाहीत. लोकसभेत अयोध्येत देखील वाचवू शकले नाहीत, मग ते महाराष्ट्रात येऊन काय करणार?" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut :  जयश्री थोरातांसंदर्भात भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य, संजय राऊत बोलले, की...
जयश्री थोरात, सुजय विखेImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 26, 2024 | 12:04 PM
Share

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटात सध्या 85-85-85 चा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, काही जागांचा तिढा अजून कायम आहे. मविआमध्ये समजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे पक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याही जागा वाटपाच्या काही मागण्यावर आहेत. त्यावर संजय राऊत बोलले आहेत. “शेकाप पक्षासोबत आज आमची बैठक आहे. शरद पवार यांनी शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे. आज दिवसभरात आम्ही चर्चा करू. जिथे जिथे मित्र पक्ष जिंकण्याची शक्यता आहे ती जागा आम्ही त्यांना देऊ” असं संजय राऊत म्हणाले.

“सांगोल्याची जागा शिवसेनेची आहे. तिकडे शिवसेनेचे आमदार होते. अलिबागला देखील दोन वेळा शिवसेना जिंकलेली आहे. अशा अनेक जागा आहेत ज्याच्या वरतीच आज आणि उद्या चर्चा होऊ शकते” असं संजय राऊत म्हणाले. जयश्री थोरातांसदर्भात भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीला दंगली घडवायच्या आहेत. भाजपा संस्कारहीन पक्ष आहे, विकृत लोक त्या पक्षात भरलेले आहेत. घरंदाज व राजकारणातल्या चांगल्या स्त्रियांविषयी अपशब्द वापरणे आणि त्यातून तणाव निर्माण करणं हा नवीन धंदा त्यांनी सुरू केला आहे”

‘महाराष्ट्रात येऊन बाबाजी काय करतील?’

“योगी आदित्यनाथ आमचे चांगले मित्र आहेत. बाबाजींचा आम्ही आदर करतो. ते आमचे बाबाजी आहेत, आम्ही आमचे प्रेम आणि आशीर्वाद एकामेकात वाटून घेतो. मात्र आता राजकारणाची गोष्ट आहे, यात महाराष्ट्रात येऊन बाबाजी काय करतील?. बाबाजी प्रत्येक ठिकाणी जातात. बाबाजी आपल्या स्वतःच्या उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पार्टीला वाचवू शकले नाहीत. लोकसभेत अयोध्येत देखील वाचवू शकले नाहीत, मग ते महाराष्ट्रात येऊन काय करणार?” अशा शब्दात संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.