AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : 23 जानेवारीला ठाकरे गटात मोठा भूकंप होणार का? संजय राऊत यांचं उत्तर काय?

"पश्चिम बंगालमध्ये संजय रॉयचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जन्मठेपेची शिक्षा झाली. महाराष्ट्रातही अक्षय शिंदेच्या बाबतीत हे करता आलं असतं. पण खोटं एन्काऊंटर करुन विधानसभा निवडणुकी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पाच पोलीस फासावरत जात आहे. या बद्दल त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut :  23 जानेवारीला ठाकरे गटात मोठा भूकंप होणार का? संजय राऊत यांचं उत्तर काय?
खासदार संजय राऊत
| Updated on: Jan 21, 2025 | 10:12 AM
Share

“महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरुन दंगल सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरुन त्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरुन लोकांनी दंगल करणं. टायर जाळणं, धमक्या देणं, तटकरेंविरोधात घोषणा देणं. नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. बीडच्या पालकमंत्री पदाबाबतही तसाच घोळ आहे. महाराष्ट्रात यांना जे बहुमत मिळालय त्याचा हे अनादर करतायत” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्रीपदाची घोषणा करुन उदय सामंत यांच्यासोबत परदेशात गेले. एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, भाजपच स्वत:च बहुमत आहे, तरीही ते आपल्याच पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“पालकमंत्री पदावरुन जी दंगल सुरु आहे, ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी आहे. नाशिकमध्ये कुंभेळ्याच फार मोठं बजेट आहे. रायगडचे व्यवहार सगळ्यांना माहीत आहेत, सधन जिल्हा आहे. उद्योग, इंडस्ट्री आहे. त्यांना छळून जास्तीत जास्त खंड्ण्या कशा गोळा करता येतील, असाच एक हिशोब तिकडे नेहमी असतो. आर्थिक देवाण-घेवाणीतून या सर्व मारामाऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाच्या निर्णयांना स्थगिती देऊन मी लाचार, हतबल मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिलय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात याआधी असं झालं नव्हतं

“पालकमंत्रीपदाच्या निर्णयात केंद्राने हस्तक्षेप करुन दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केलाय. मुख्यमंत्री निर्णय घेण्याचा आणि सरकारमधील गुंडागर्दी मोडण्याचा प्रयत्न करतायत. पण दिल्ली पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर येऊन दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. महाराष्ट्रात याआधी असं झालं नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले.

पाच पोलिसांवर गुन्हा दाखल झाला त्याला जबाबदार कोण?

नाशिक आणि रायगडच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळेल असं वाटतं का? “महाराष्ट्रातून दिल्लीला कोण जास्त थैल्या देतं, त्यावरुन त्याचं वजन ठरतं. कधी नव्हे इतका थैल्यांचा व्यापार महाराष्ट्र आणि दिल्लीत झालाय” असं संजय राऊत म्हणाले. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातही संजय राऊत बोलले. “आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊटर नसून खून झाला असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला, त्या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल झाला त्याला जबाबदार कोण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

हे अमित शाह यांच्या करंगळीवर उभं राहिलेलं पाप

राहुल शेवाळे हे 23 जानेवारीला भूकंप होणार असं बोलले आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “राहुल शेवाळे यांचा दारुण पराभव शिवसेनेने केला. अजून किती फोडाफोडी करणार, अमित शाह आहेत, तो पर्यंत तुमचा पक्ष आहे. त्यानंतर तुम्हाला भविष्य आणि भवितव्य नाही. तुमचे लटकते-भटकते आत्मे होणार. अमित शाहंच आशिर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल देतं. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून निवडणूक जिंकताय. तुमची विचारधारा काय?. हे अमित शाह यांच्या करंगळीवर उभं राहिलेलं पाप आहे”

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.