BMC Election 2022- Kokan Nagar ( Ward 115)-कोकण नगर वार्डात शिवसेनेचे उमेश माने आपला गड राखणार का?
2017 च्या निवडणुकीत शिवसनेच्या उमेदवार उमेश माने यांनी सर्वाधिक 8 हजार 232 मते घेऊन बाजी मारली होती. सर्वसाधारण आरक्षित या वार्डामधून उमेश माने याने भारतीय जनता पार्टीच्या घाडीगावकर जितेंद्र दत्तात्रय या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. कोरोनानंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप , शिवसेनेमध्ये चुरशीची लढत दिसणार आहे.

मुंबई- येत्या काळात बृहन्मुंबई महानगर पालिकेची(BMC Election) निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणाऱ्या या निवडणुकीत भाजप व शिवसेनेमध्ये चांगलीच चुरस दिसणार आहे. वार्ड क्र -115 कोकण नगर म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत शिवसनेच्या (Shivsena)उमेदवार उमेश माने यांनी सर्वाधिक 8 हजार 232 मते घेऊन बाजी मारली होती. सर्वसाधारण आरक्षित या वार्डामधून उमेश माने याने भारतीय जनता पार्टीच्या घाडीगावकर जितेंद्र दत्तात्रय या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. कोरोनानंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीत (Election)पुन्हा एकदा भाजप , शिवसेनेमध्ये चुरशीची लढत दिसणार आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना , भाजपबरोबरच काँग्रेसच्या काशीनाथ, कराडकर, लोक जनशक्ती पार्टीचे अशोक खरात मनसेकडून सराफे वैष्णवी , बहुजन समाजवादी पार्टीकडून नवाझ कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. याबरोबरच अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढवली होती.
मागच्या निवडणुकीत काय घडलं?
2017 च्या निवडणुकीत वार्ड क्र115 सर्वसाधारण होता. या निवडणुकीत शिवसेना भाजप, काँग्रेस , मनसे ,बहुजन समाजवादी पार्टी, लोक जनशक्ती पार्टी अपक्ष उमेदवारांनी स्वबळावर ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसनेच्या उमेदवार उमेश माने 8 हजार 232 मते मिळवत विजयाची माळ स्वतःच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीतही वार्ड 115 मध्ये उमेश माने यशस्वी ठरणार का? थेट होणाऱ्या या लढतीमध्ये अनेक उमदेवारांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्य उमेदवारांची स्थिती कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2017च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो
वैष्णवी सरफरे -मनसे -2678 ,
कुरेशी नवाझ – बहुजन समाजवादी पार्टी- 191 ,
उमेश माने- शिवसेना -8232 ,
यासीन कुरेशी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-1335,
कराडकर काशिनाथ – भारतीय काँग्रेस पक्ष -2353 ,
घाडीगावकर जितेंद्र – भाजप- 4949 ,
पठारे राजू -अपक्ष -95
राजभोज अनिल – अपक्ष -2503 ,
वाघ राजेंद्र -अपक्ष – 55 अन्य तीन जणांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
वार्ड कुठून कुठपर्यंत
या वार्डात सदर प्रभागात निर्मल नगर, जयदेव सिंग नगर पंजाबी कॉलनी, रामनगर, दिना बामा ईस्टेट , आंबेडकर नगर, एम.एम. आर. डी. ए. कॉलनी, आंबेडकरनगर, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी या ठिकाणाचं समावेश आहे.
मतदार संघाची लोकसंख्या किती
या वार्डात एकूण मतदार संख्या 48 हजार336 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या1 हजार 962 आहे. तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 437 एवढी आहे.
