विधिमंडळात मांडला जाणारा प्रश्न ऐनवेळी मागे घेता येऊ नये : नाना पटोले

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (11 मार्च) पुन्हा एकदा आपल्या अधिकारांचा उपयोग करत आमदारांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर बडगा उगारला आहे (Nana Patole on assembly rules).

विधिमंडळात मांडला जाणारा प्रश्न ऐनवेळी मागे घेता येऊ नये : नाना पटोले
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 4:36 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (11 मार्च) पुन्हा एकदा आपल्या अधिकारांचा उपयोग करत आमदारांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर बडगा उगारला आहे (Nana Patole on assembly rules). त्यांनी सभागृहात ऐनवेळी प्रश्न मागे घेण्याच्या आमदारांच्या अधिकारावर चाप लावण्याची शिफारस केली आहे. अनेक आमदार विधिमंडळात वेगवेगळ्या मार्गांनी प्रश्न उपस्थित करण्यासाठी करतात. मात्र, अचानक प्रश्न विचारण्याची वेळी की प्रश्न मागे घेतात. यामुळे खरोखर प्रश्न विचारण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांवर अन्याय होतो, अशी स्पष्ट भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. तसेच सभागृहाला प्रश्न मागे घेण्याची तरतूद रद्द करण्यासंबंधात शिफारस केली.

नाना पटोले म्हणाले, “विधिमंडळ सदस्यांनी उपस्थितीत केलेला प्रश्न ऐनवेळेला समाधान झाल्याचं सांगत मागे घेण्यात येतो. यासाठी विधिमंडळाच्या नियमावलीत नियम 83 नुसार सदस्यांना प्रश्न मागे घेण्याचा अधिकार आहे. तशी कायदेशीर मुभा आमदारांना देण्यात आली आहे. मात्र, अनेकदा आमदार प्रश्न उपस्थित करण्याच्या वेळी हजर राहत नाहीत. त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रश्नांवर अन्याय होतो. त्यामुळे नियम 83 चा अधिकार रद्द करण्यात यावा.”

नाना पटोले यांच्या या शिफारशीला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही पाठिंबा दिला. काही सदस्य अशा नियमांच्या आड अधिकारांचा दुरुपयोग करतात, असं मत जाधव यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या शिफारशीचं स्वागत केलं. हा नियम रद्द करण्यासंदर्भात नियमावली समितीच्या सल्ल्याचा विचार करुन निर्णय घेवा, असं मत फडणविसांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कालानुरूप अशा नियमांबाबत विचार करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच सभागृहात चोख काम होण्यावर भर दिल्याचं दिसत आहे. आमदारांच्या प्रश्नांना उत्तर न मिळाल्याने याआधी त्यांनी थेट मुख्य सचिवांना सभागृहात येऊन माफीचे आदेश दिले होते. मात्र, इतर नेत्यांनी पुन्हा अशी चूक होणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आदेश मागे घेतले होते.

एकूणच नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे सभागृहाच्या कामाला शिस्त लागताना दिसत असल्याचं मत अनेक विधिमंडळ सदस्य व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या:

पुराला जबाबदार महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा : नाना पटोले

Nana Patole on assembly rules

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.