AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं

आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 04, 2020 | 10:31 AM
Share

मुंबई : खातेवाटपाला होत असलेल्या दिरंगाईचं नेमकं कारण राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. नवीन खाती निर्माण करण्याचा विचार सुरु असल्यामुळे उशीर होत असल्याचा दावा मलिक यांनी केला. येत्या सोमवारपर्यंत मंत्रिपदं जाहीर केली जातील, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे शनिवार-रविवारचे दोन दिवस तरी खातेवाटपाचा मुहूर्त निघणार नसल्याचं (Nawab Malik on Portfolio Allocation) स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे तीन पक्षात रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा होत्या. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटपाचा घोळ कायम असल्यामुळे नेमकं कुठे पाणी मुरतंय, असा प्रश्न विचारला जात होता. आधी, काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याच्या चर्चा होत्या, नंतर खातेवाटपही लांबल्याचं बोललं जात आहे. मात्र नवाब मलिक यांनी नाराजी आणि तणातणीच्या चर्चा फेटाळल्या.

खातेवाटपाच्या दिरंगाईला दुसरं कोणतंही कारण नाही. आम्ही नवीन विभाग तयार करण्याचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ), मेट्रोशी संबंधित नवीन खाती निर्माण करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सहकार खात्यावरही काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र शिवसेनेचा कृषी खातं सोडण्यास नकार असल्यामुळे तणातणीची चिन्हं आहेत.

दुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसचा नकार आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं. आता खातेवाटपावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं (Nawab Malik on Portfolio Allocation) आहे.

काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप

बाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम नितीन राऊत – ऊर्जा विजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी के. सी. पाडवी – आदिवासी विकास यशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?

अनिल देशमुख- गृह अजित पवार– अर्थ आणि नियोजन जयंत पाटील– जलसंपदा दिलीप वळसे पाटील– कौशल्य विकास आणि कामगार जितेंद्र आव्हाड– गृहनिर्माण नवाब मलिक– अल्पसंख्याक हसन मुश्रीफ– सहकार धनंजय मुंडे– सामाजिक न्याय

शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी

एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम सुभाष देसाई– उद्योग आणि खनिकर्म अनिल परब– सीएमओ आदित्य ठाकरे– पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत– परिवहन

Nawab Malik on Portfolio Allocation

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...