संघ-भाजपच्या विचारसरणीचे खडसे राष्ट्रवादीत कसं काम करतील?, नवाब मलिक म्हणतात….

हृदय परिवर्तन हे होतच असतं. त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

संघ-भाजपच्या विचारसरणीचे खडसे राष्ट्रवादीत कसं काम करतील?, नवाब मलिक म्हणतात....

मुंबई: भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, गेली 40 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीत वाढलेले खडसे राष्ट्रवादीत रमतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. हृदय परिवर्तन हे होतच असतं. त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. (nawab malik slams girish mahajan over eknath khadse resignation)

‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना नवाब मलिक यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल असं जाणकार म्हणत आहेत. पण खडसे यांची विचारसरणी भाजप आणि संघाची आहे. राष्ट्रवादीत ते कसं काम करतील? असा सवाल मलिक यांना करण्यात आला. त्यावर हृदय परिवर्तन हे होतच असतं. त्यांचंही हृदय परिवर्तन झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, असं मलिक म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर केलेल्या टीकेचा समाचारही घेतला. आत्मचिंतन करण्याची गरज खडसेंना नाही. त्यांना कुणी सल्लाही देऊ नये. उलट ज्या दोन-चार लोकांनी 40 वर्षे पक्ष वाढवला. पक्षाला उभारी दिली. त्यापैकी एका बड्या नेत्याला पक्ष सोडून का जावं लागतं? याचं भाजपनं नक्कीच आत्मचिंतन करावं, असा टोला त्यांनी महाजन यांना लगावला. खडसेंना पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं, असा टोला महाजन यांनी लगावला होता. त्यावर मलिक बोलत होते.

लाड यांचीही टीका

दरम्यान, खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांच्यावर किंवा भाजपवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला कोणीच आळा घालू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आरोप करणं नेहमी सोपं असतं. ते सिद्ध करणं तेवढंच कठिण असतं. आता फक्त भाजप नेतृत्वावर टीका करण्यासाठी खडसेंचा राष्ट्रवादीत उपयोग होऊ नये. त्यांना मंत्रिपद मिळावं पण फक्त भाजपवर आरोप करमअयासाठी त्यांना पक्षात घेतलं जाऊ नये. त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करण्यात यावा, असा सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना दिला होता. (nawab malik slams girish mahajan over eknath khadse resignation)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंनी स्वत: केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपचा पहिला थेट हल्ला

एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल; भाजपचा पलटवार

“शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच”

(nawab malik slams girish mahajan over eknath khadse resignation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI