AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | पडद्यामागे घडामोडी वाढल्या, शरद पवार दिल्लीत, काहीतरी मोठं घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. असं असताना दिल्लीतून मोठी बातमी आहे. कारण दिल्लीत आज रात्री साडेआठ वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे.

BREAKING | पडद्यामागे घडामोडी वाढल्या, शरद पवार दिल्लीत, काहीतरी मोठं घडतंय?
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2023 | 7:04 PM
Share

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे नुकतीच मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडींमधून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्याच्या राजकारणात सध्या अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. तसं असताना आताच्या घडीला पडद्यामागे काय घडतंय ते आगामी काळासाठी महत्त्वाचं असणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आज रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला राहुल गांधी हे सुद्धा असणार आहेत. शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची असणार आहे. नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत आले होते. त्यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गेल्या दोन दिवसांत विरोधकांच्या महत्त्वाच्या बैठकादेखील पार पडल्या. पण या दोन दिवसांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुणीच उपस्थित नव्हतं. त्यानंतर आज शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार?

राहुल गांधी वायनाडला गेले होते तेव्हा पुन्हा स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या विषयाचे पोश्टर झडकले होते. विशेष म्हणजे शरद पवारांनी याबाबत उघड विरोध केल्यानंतरही काँग्रेसची भूमिका अद्याप बदललेली नाही. त्यामुळे याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर निवडणूक लढू शकते. याबाबत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायचं या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांनी अदानींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेससोबत पहिली बैठक

विरोधकांकडून वारंवार उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीएस चौकशीची मागणी केली जात आहे. पण गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी जेपीएस चौकशीची गरज नाही. त्यासाठी कोर्टाची समिती गठीत करुन चौकशी करता येईल, अशी भूमिका मांडलेली. पण त्यांच्या या भूमिकेवर अनेकांना धक्का बसलेला. दुसरीकडे इतर विरोधी पक्ष हे अदानी यांच्या जेपीएस चौकशीच्या मागणीवर ठाम आहेत. याबाबत विरोधी पक्षातच मतभेद समोर असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर पवारांनी आपली भूमिका बदलली. इतर विरोधी पक्षांची जेपीएस चौकशीची मागणी असेल तर आपला त्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केल्याची माहिती समोर आलेली. या सगळ्या घडामोडींनंतर आता शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट होताना दिसत आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.