AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना प्रफुल्ल पटेल, ना विद्यमान खासदार, भंडारा-गोंदियातून राष्ट्रवादीचा नवा चेहरा

भंडारा : लोकसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादीने अखेर भंडारा-गोंदियाचा उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांचं नाव निश्चित केलं आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता होती. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याचा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह होता. मात्र, राष्ट्रनादीने प्रफुल्ल पटेल यांना डावलून […]

ना प्रफुल्ल पटेल, ना विद्यमान खासदार, भंडारा-गोंदियातून राष्ट्रवादीचा नवा चेहरा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

भंडारा : लोकसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादीने अखेर भंडारा-गोंदियाचा उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांचं नाव निश्चित केलं आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता होती. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याचा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह होता. मात्र, राष्ट्रनादीने प्रफुल्ल पटेल यांना डावलून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी घोषित केली. तसेच भंडारा-गोंदियाचे सध्याचे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचाही पत्ता कट झाला आहे. त्यासोबतच आता राष्ट्रवादीच्या 20 पैकी 19 उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. फक्त रावेरच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब बाकी आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल किंवा त्यांच्या पत्नीला भंडारा-गोंदिया मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांच्या रुपात एक नवा चेहरा निवडणुकीत समोर आणला आहे.

48 पैकी काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादी 20 जागा लढणार आहे. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना प्रत्येकी दोन अशा चार जागा देणार आहे.

राजू शेट्टी सध्या हातकणंगलेतून खासदार आहेत. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीला देण्यात आली आहे. शिवाय सांगली, अकोला किंवा वर्धा यापैकी एक जागा काँग्रेसच्या कोट्यातून दिली जाणार आहे. दुसरीकडे पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला मिळणार आहे. तर अमरावतीची जागा अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीकडून लढण्यासाठी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासाठी अमरावतीची जागा सोडली जाणार आहे.

महाआघाडीत कोण किती जागा लढणार?

काँग्रेस – 22

राष्ट्रवादी – 20

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 02

बहुजन विकास आघाडी – 01

युवा स्वाभिमानी – 01

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पंचबुद्धे यांच्यासमोर भाजपचे सुनील मेंढे यांचं आव्हान आहे. रविवारी दुपारी भाजपने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. यामध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुनील मेंढे हे सध्या भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

संबंधित बातम्या :

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!

भाजपची नवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील एक उमेदवार घोषित

उदयनराजेंसाठी आघाडीतले सर्व नेते एकवटले!

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.