माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश जवळपास पक्का मानला जातोय. मनोहर नाईक (Manohar Naik) हे राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नाईक घराण्याच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरुच आहे. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला विदर्भात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश जवळपास पक्का मानला जातोय. मनोहर नाईक (Manohar Naik) हे राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नाईक घराण्याच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जातो. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. पण या विधानसभेला इंद्रनील नाईक यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी सोडणार असून शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे नाईक यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जातोय.

कोण आहेत मनोहर नाईक?

मनोहर नाईक हे प्रत्येक सरकारमध्ये मंत्री होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. इंद्रनील नाईक हे सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत. पुसदमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीला कधीच खिंडार नव्हती. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि जिल्हा परिषदही भाजपला जिंकून दिली. पण बालेकिल्ला हातचा जाऊ नये यासाठी इंद्रनील नाईक यांनाच भाजप किंवा शिवसेनेत पाठवण्याचा मनोहर नाईक यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

30 जुलैला राष्ट्रवादीला मोठं भगदाड?

येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.

अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोहिम फत्ते केल्याची माहिती आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *