AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाच्या ‘या’ आमदाराचं महायुतीला मतदान; जयंत पाटील यांनी घेतलं उघडपणे नाव

आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. शरद पवार यांच्यासोबत आहोत. त्यात काही बदल होणार नाही, असं सांगतानाच विधान परिषद निवडणुकीच्या बैठका होत्या. परवा रात्रभर जागलो. झोपलो नव्हतो. काल आठ वाजता घरी गेलो आणि झोपलो. त्या आधी कार्यकर्त्यांशी बोललो. आज मी तुमच्यासमोर आलो आहे, असं शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार गटाच्या 'या' आमदाराचं महायुतीला मतदान; जयंत पाटील यांनी घेतलं उघडपणे नाव
jayant patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2024 | 5:40 PM
Share

विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. क्रॉस व्होटिंग झाल्याने पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या कोट्यातील सात मते फुटली. ही मते महायुतीला गेली. पण शरद पवार गटाचंही एक मत फुटलं आणि त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावं लागलं असं सांगितलं जात आहे. स्वत: जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार गटाच्या कोणत्या आमदाराने मतदान केलं नाही, त्याचं नावच जयंत पाटील यांनी जाहीरपणे घेतलं आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना या आमदाराचं नाव घेतलं. शरद पवार गटाकडे 12 मते होती. त्यातील 11 मते मला मिळाली. एक मत माझ्या मित्राचं होतं. त्यामुळे माझ्या मतांची संख्या 12 झाली. आमदार मानसिंग नाईक यांचं मत फुटलं. नाईक मतदानाला आयत्यावेळी आले. मिटिंगला आमच्यासोबत होते. मतदान करण्यापूर्वी आम्हाला भेटून गेले. पण मला मत दिलं नाही. कोण कोणाला मतदान करतं ते कळतं. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही पक्षाची भक्कम मते मला मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

आम्ही बेसावध राहिलो

मला 12 वं मत मिळालं. ते महायुतीतील माझ्या मित्राचं मत होतं. महायुतीतील मित्राने मला मतदान केलं. म्हणजे महायुतीचं एक मत फुटलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. आम्ही थोडे बेसावध राहिलो. आमची ताकद कमी आहे, त्यामुळेच हा निकाल आला. माझ्या पराभवाने माझे सहकारी आणि सभागृहही हळहळलं, असं जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या पसंतीने जिंकला

काँग्रेसची दुसरी पसंती मला होती. मला फक्त तीन मते हवी होती. नाही तर विजय आमचाच होता. महाविकास आघाडीकडे 69 मते होती. समान वाटप झालं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. काँग्रेसची मते फुटलेली दिसत आहेत. काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली हे दुर्देव आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अमिषं मिळाली

या निवडणुकीत घोडेबाजार झाला. कुणाला वर्क ऑर्डर मिळाल्या. कुणाला पैसे मिळाले असं मी ऐकतोय. 20 कोटी रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. मी एवढी मोठी रक्कम एकत्रपणे कधी पाहिली नाही, असं सांगतानाच निवडणुकीचा अंदाज आल्यानंतर मी मतदान केंद्राबाहेर पडलो होतो. निकाल काय लागेल एव्हाना लक्षात आले होते, असंही ते म्हणाले.

180 जागा जिंकू

विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. महायुतीसाठी विधानसभा सोपी नाही. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 180 जागा मिळतील, असा दावा करतानाच आता भाजपवाले चंद्रावरही सत्ता स्थापन करतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट