AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडळकरांची पवारांवर टीका, लंकेंनी समाचार घेतला, म्हणाले, ‘गोपीचंद 100 टक्के चुकले पण…’

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand paalkar) यांचा समाचार घेतला आहे. (Nilesh Lanke Slam MLC Gopichand Padalkar Over Sharad pawar)

पडळकरांची पवारांवर टीका, लंकेंनी समाचार घेतला, म्हणाले, 'गोपीचंद 100 टक्के चुकले पण...'
निलेश लंके आणि गोपीचंद पडळकर
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 12:13 PM
Share

अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand paalkar) यांचा समाचार घेतला आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही, असा इशाराच पडळकरांना दिला आहे. (NCP  MLA Nilesh Lanke Slam MLC Gopichand Padalkar Over Sharad pawar)

निलेश लंकेंकडून पडळकरांचा समाचार

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एकामागोमाग एक शाब्दिक वार केले. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या पडळकरांना तुटून पडले आहेत. अशातच लंकेंनी अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही, असा उघड इशाराच पडळकरांना दिला आहे.

अशी वक्तव्य खपवून घेणार नाही

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटलंय.

रात्री गाडीवर हल्ला, आज सकाळी पुन्हा राष्ट्रवादीवर टीकास्त्र

“माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी आज (गुरुवार) सोलापुरात बोलताना केली.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

(NCP  MLA Nilesh Lanke Slam MLC Gopichand Padalkar Over Sharad pawar)

हे ही वाचा :

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

‘प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला’, दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, रोहित पवारांचा फोटो ट्विट!

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.