AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय, विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास, रोहित पवारांचा राज्यपालांना सणसणीत टोला

राज्य शासनाने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांना लगावला आहे.

सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय, विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास, रोहित पवारांचा राज्यपालांना सणसणीत टोला
रोहित पवार आणि भगतसिंह कोश्यारी
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 3:15 PM
Share

पुणे :  राज्य शासनाने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) यांना लगावला आहे. एका युजर्सने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण MPSC  आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचं काय झालं?, असा सवाल विचारला. त्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.

ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाहीय. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला.

युजर्सच्या प्रश्नाला रोहित पवारांचं उत्तर, त्याचवेळी राज्यपालही निशाण्यावर

ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने 31 जुलै च्या आधी MPSC आयोगातील सदस्य भरणार होते, काय झालं? असं सवाल विचारणारं ट्विट केलं. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरं देणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं. ज्यातून 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास

माननीय अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.

राज्याच्या हिताच्या कोणत्याही निर्णयात खोडा घालण्याचा राज्यपालांचा कलकलमी कार्यक्रम

31 जुलैपूर्वी एमपीएससी आयोगामधील रिक्त जागा भरण्यासंदर्भात अजितदादांनी विधानसभेत शब्द दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली. पण राज्याच्या हिताचा कोणताही निर्णय असला की त्याला खोडा घालण्याचा एककलमी कार्यक्रम राज्यपालांनी हातात घेतलाय की काय असा प्रश्न पडतो. कारण हा निर्णय देखील त्यांनी रखडवून ठेवला आहे, असा टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरणार, अजितदादांनी केली होती घोषणा

पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 31 जुलैपूर्वी आयोगातील सर्व महत्त्वाची पदे भरण्यात येतील, अशी माहिती त्यांनी अधिवेशन काळात विधानसभेत दिली. त्यानुसार 31 जुलैपूर्वीच सदस्यांची यादी राज्य शासनाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे.

(NCP MLA Rohit Pawar Taunt BhagatSinh Koshyari Over MPSC Post and 12 MLC Issue)

हे ही वाचा :

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.