‘दोन शिवसैनिकांची भेट’, राऊतांच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हेंचं खास ट्विट

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची गुरुवारी भेट घेतली. राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खास ट्विटही केलं. (NCP MP Amol Kolhe meet Shivsena MP Sanjay Raut)

'दोन शिवसैनिकांची भेट', राऊतांच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हेंचं खास ट्विट
अमोल कोल्हे आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 10:51 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची गुरुवारी भेट घेतली. राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खास ट्विटही केलं. ‘संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या नक्कीच लाभ होईल’, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे संजय राऊतांच्या भेटीला

सध्या राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नेते मंडळींच्या गाठीभेटींचा कार्यक्रम जोरात सुरु आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर कोल्हेंनी पहिल्यांदाच राऊत यांची वैयक्तिक भेट घेतली.

राऊतांच्या भेटीनंतर खासदार कोल्हेंचं खास ट्विट

“शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल”, असं ट्विट कोल्हेंनी भेटीनंतर केलं.

खासदार कोल्हेंचा राजकारणाचा श्रीगणेशा शिवसेनेतून

अमोल कोल्हे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा शिवसेनेतून केला होता. खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला सेनेमधूनच सुरुवात झाली. त्यांचं आक्रमक रुप, भाषण करण्याची स्टाईल, ते सारारत अससेली शिवाजी महाराजांची भूमिका, अफाट लोकप्रियता, यांच्या बळावर त्यांना राजकारणात फार थोड्या वेळात मोठी प्रसिद्धी मिळाली. पण शिवसेनेत त्यांना निव़णूक लढविण्याची संधी मिळाली नाही.

अमोल कोल्हेंचं धक्कातंत्र, 2019 च्या लोकसभेला राष्ट्रवादीत प्रवेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी खासदार कोल्हे यांनी शिवसेनेला धक्का देत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधून शिरुर लोकसभेचं राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं. शिवसेनेचे दिग्गज उमेदवार आणि विजयी चौकार मारण्यासाठी आसुसलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना आश्चर्यकारररित्या कोल्हेंनी पराभवाचं तोंड पाहायला लावलं.

नंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली. राज्यात महालिकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. साहजिक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जवळीकता वाढत गेली… आताही वाढते आहे… नेते मंडळींमध्ये गाठीभेटी होतायत… चर्चा होतायत…

(NCP MP Amol Kolhe meet Shivsena MP Sanjay Raut)

हे ही वाचा :

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.