देशमुखांचा राजीनामा घेणार का? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार का? पवार हसून म्हणाले…

गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? या प्रश्नावर बोलताना पवार हसले आणि ही नवीनच बातमी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

देशमुखांचा राजीनामा घेणार का? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार का? पवार हसून म्हणाले...


नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकार योग्य काम करत आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. त्याचबरोबर सचिन वाझे प्रकरणावर बोलताना मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. कारण या प्रकरणात एक राष्ट्रीय यंत्रणा तपास करत आहे. त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, हे पाहणं आमचं काम असल्याचं पवार यांनी म्हटलंय. इतकच नाही तर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? या प्रश्नावर बोलताना पवार हसले आणि ही नवीनच बातमी असल्याचं त्यांनी म्हटलंय.(Sharad Pawar has made it clear that Home Minister Anil Deshmukh will not resign in the Sachin Waze case)

राजधानी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी केरळमध्ये काँग्रेसला रामराम ठोकलेले पी. सी. चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांनी चाको यांना राष्ट्रवादीचा रुमाल देत पक्षात स्वागत केलं. प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

‘तपास यंत्रणेला राज्य सरकार सहकार्य करतंय’

चाको यांच्या प्रवेशानंतर शरद पवार यांना पत्रकारांनी सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारले. त्यावेळी पवारांनी महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीनं काम करत असल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर सचिन वाझे प्रकरणावर बोलताना एका इन्स्पेक्टरशी निगडीत मुद्द्याचा राज्य सरकारवर परिणाम होणार नसल्याचं पवारांनी म्हटलंय. मात्र दोन दिवसांपूर्वीच हा लोकल मद्दा असल्याचं पवारांनी म्हटलं होतं. सध्या हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहे. आमचं काम आहे त्यांना सहकार्य करणं आणि त्यांच्या कामात कुठलाही अडथळा येणार नाही हे पाहणं, सरकार हे काम करत असल्याचा दावाही पवारांनी केलाय.

गृहमंत्री, पोलीस आयुक्तांबाबत पवार काय म्हणाले?

गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रकरण हाताळण्यात कमी पडले म्हणून त्यांना पदावरुन हटवलं जाण्याची चर्चा सुरु आहे, त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ही नवीनच बातमी असल्याचं पवार म्हणाले. यावेळी पवार आणि अन्य उपस्थित नेतेमंडळी हसल्याचंही पाहायला मिळालं. महाराष्ट्र सरकारनं हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलं म्हणूनच सर्व प्रकार उघडकीस येत आहे. गृहमंत्रालयानं उचललेल्या पावलांमुळेच अनेक मुद्दे समोर आल्याचा दावाही त्यांनी केलाय.

तर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याची चर्चाही सध्या सुरु आहे. त्यावर बोलताना याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोला. तेच याप्रकारचे निर्णय घेत असतात, असं सांगत पवार यांनी प्रश्नाला बगल दिली.

मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी नेहमी चर्चा होत असते. केंद्र सरकारच्या योजना, अन्य मुद्द्यांबाबतही चर्चा होत असते, या बैठकीतही अशीच चर्चा झालाचं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘त्या’ गाडीविषयी कुठलंही रेकॉर्ड ठेवू नये, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, उपनिरीक्षक टाकेंचा धक्कादायक खुलासा

वाझेप्रकरणी देशमुखांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा; प्रसाद लाड यांची जोरदार मागणी

Sharad Pawar has made it clear that Home Minister Anil Deshmukh will not resign in the Sachin Waze case

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI