AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, पवार-गडकरींमध्ये चर्चा; गिरीश बापटांचं गडकरींचा पत्र

पुणे विमानतळासमोरील 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्याबाबतही आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. नितीन गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, पवार-गडकरींमध्ये चर्चा; गिरीश बापटांचं गडकरींचा पत्र
शरद पवार, नितीन गडकरींची पुण्यात भेट, गिरीश बापट, सुनील तटकरेंची उपस्थिती
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 11:28 AM
Share

पुणे : राज्य तसंच देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची आज पुण्यात भेट ठाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिलीय. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं. (Nitin Gadkari and NCP President Sharad Pawar’s Discussion about Pune Airport)

पुणे विमानतळासमोरील 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्याबाबतही आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. नितीन गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती बापट यांनी दिली.

पवार, गडकरींमध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबतही चर्चा

दुसरीकडे शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात मुंबई-गोवा महामार्गाबाबतही चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलीय. आजची बैठक फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली लागेल, असं तटकरे म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. मात्र, त्यांनाही अशी मदत करता आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं निकष बदलून मदत करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार हे किवळ राजकीय भाष्य आहे, यामध्ये फारसं तथ्य नाही, असा दावाही तटकरे यांनी यावेळी केलाय.

पुणे विमानतळावर लवकरच 5 लाख चौरस फुटांचं टर्मिनल

पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला.

खासदार गिरीश बापट हे मागील तीन वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाचा पाठपुरावा करत आहेत. 30 ऑगस्टला पार पडलेल्या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाकडून बापट यांना सविस्तर माहिती देण्यात आली. दरम्यान, बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेून पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत माहिती दिली होती.

पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कसं असेल?

>> पुण्यातील नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित असेल.

>> दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची क्षमता

>> गर्दीच्या काळात 2 हजार 300 प्रवाशांना सेवा देता येणार.

>> नव्या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचवणारे 5 नवे मार्ग

>> 8 स्वयंचलित जिने, 15 लिफ्ट, 34 चेक-इन काऊंटर असतील

>> प्रवासी सामान वहन यंत्रणा, 5 कन्व्हेयर बेल्टसह अन्य अद्यावत सुविधा

>> नवं टर्मिनल पर्यावरणास अनुकूल असेल

>> खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा

>> पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था

>> अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे

इतर बातम्या :

गडकरी पवारांचा एकत्रित हवाई प्रवास, विखे स्वागताला सज्ज, नगरच्या कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष!

प्रभाग रचनेविरोधात मनसेची राज्यपालांकडे दाद; राज यांच्या आवाहनानंतर पक्ष आक्रमक, सोमवारी याचिका दाखल करणार

Nitin Gadkari and NCP President Sharad Pawar’s Discussion about Pune Airport

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.