AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, पण आव्हानांचा डोंगर समोर, नेमकी कोणती आव्हानं?

जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या गळ्यात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. मात्र, यावेळी नितीशकुमार यांच्यासमोर बरीच आव्हानं असणार आहेत.

नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, पण आव्हानांचा डोंगर समोर, नेमकी कोणती आव्हानं?
| Updated on: Nov 13, 2020 | 4:43 PM
Share

पाटणा :  जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार (Nitish Kumar)  यांच्या गळ्यात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. मात्र, यावेळी नितीशकुमार यांच्यासमोर बरीच आव्हानं असणार आहेत. यावेळी बिहारमध्ये सत्तेचे समीकरण आणि बिहारचे राजकीय वातावरण दोन्हीही वेगळे आहेत. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळायची म्हटल्यावर नितीशकुमार यांना यावेळी बरीच मेहनत घ्यावी लागेल. (Nitish Kumar will be Chief Minister of Bihar But have to face different challenges)

नितीशकुमार यांनी आधी सहा वेळा मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या सत्तेचा सोपान हाकलेला आहे. मागच्या वेळी नितीशकुमार यांनी फक्त भाजपसोबत युती करत सत्तेची चव चाखलेली होती. मात्र यावेळी भाजपसोबतच जीतनराम मांझी (jitan ram manjhi) यांचा हिंदुस्तान आवाम पार्टी आणि मुकेश सहानी यांचा पक्ष विकासशील इन्सान पार्टी यांचादेखील समावेश एनडीएमध्ये आहे. त्यामुळे यावेळी नितीश यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चार चणांचा अधिकार असेल. त्यामुळे नितीश कुमार यांना भाजप, जीतनराम मांझी, मुकेश सहानी यांच्याशी आपुलकीचे संबंध ठेवावे लागतील.

स्थिर सरकारसाठी प्रयत्न

नितीशकुमार यांच्यासोबत आणखी तीन पक्ष सत्तेत असतील. त्यांच्यासोबत समन्वय साधून स्थिर सरकारसाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. नितीशकुमार यांना कुणाच्याही हस्तक्षेपाविना तसेच पूर्ण खंबीरपणे काम करायला आवडतं. तशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कामाच्या या पद्धतीमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही होत आली आहे. मात्र, यावेळी बिहारच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे नितीशकुमार यांच्यासोबतच भाजप आणि इतर दोन पक्षांचाही सरकारमध्ये तेवढचा वाटा असेल. त्यामुळे त्यांना पहिल्यासाखे धडाडीने निर्णय घेण्याअगोदर आपल्या मित्रपक्षांशी सल्लामसलत करावी लागेल. त्यांच्यासमोर स्थिर सरकार ठेवण्याचं मोठं आव्हान असेल.

नितीशकुमारांच्या पक्षाला कमी मंत्रिपदं, स्वपक्षातील नाराजी

बिहार निवडणुकीत नितीशकुमारांचा जदयू पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. जदयूचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला यावेळी जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे यावेळी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात खुद्द त्यांच्याच पक्षाचे मंत्री कमी असतील. तसेच जीतनराम मांझी आणि मुकेश साहानी यांच्याही पक्षाला मंत्रिमंडळात पुरेसे स्थान द्यावे लागेल. बिहारमध्ये जास्तीत जास्त 36 मंत्रिपदं देता येऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वपक्षातील नाराजी, मित्रपक्षांचे समाधान या सर्व गोष्टी नितीशकुमार यांना आगामी काळात सचोटीने हाताळाव्या लागतील.

मजबूत विरोधी पक्षाचे आव्हान

यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या रुपात नितीशकुमार यांना प्रबळ विरोधी पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. तेजस्वी यादव यांच्या रुपाने बिहारमध्ये नवं नेतृत्व उभ राहू पाहतं आहे. त्यामुले तेजस्वी यादव यांचाही त्यांना वेळोवेळी सामना करावा लागेल.

दरम्यान, नितीश यांच्यासमोर त्यांच्या स्वत:ची राजकीय प्रतिष्ठा कायम राखण्याचेची आव्हान असेल. तब्बल सहा वेळा मुख्यमंत्रिपदी राहीलेल्या नितीशकुमार यांच्यासमोर त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवून सरकार पाच वर्षे टिकवण्याचे आव्हान असेल.

संंबंधित बातम्या :

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

(Kumar will be Chief Minister of Bihar But have to face different challenges)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.