‘मागच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत’, सर्व आलबेल असल्याचा पटोलेंचा पुनरुच्चार

काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत, असं पटोले यांनी म्हटलंय. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

'मागच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत', सर्व आलबेल असल्याचा पटोलेंचा पुनरुच्चार
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 9:25 PM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण पाहायला मिळत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असंही चित्र दिसून येत आहे. कारण, हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत, असं पटोले यांनी म्हटलंय. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. (No dispute in the Mahavikas Aghadi government, said Nana Patole)

ज्या दिवशी पहाटेचं सरकार (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी) पडलं त्या दिवसापासून विरोधक महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातात कोलीत घेऊन फिरत आहेत. पण विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही. सोनिया यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित हे सरकार आहे. त्यामुळे आमची ही मागणी कायम राहील. कॉमन मिनिममत प्रोग्रामचं पालन व्हावं, असं आवाहन पटोले यांनी आपला सहकारी पक्षांना केलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कोणतीही नाराजी नाही. सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. आमच्या सरकारमध्ये लोकशाही जिवंत आहे. मागच्या सरकारसारखी नळावरची भांडणं आमच्यात नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणलाय.

‘संजय राऊतांची वैयक्तिक वैर नाही’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणी नाना पटोले यांच्यात मागील काही दिवसांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळालं. त्यावर बोलताना संजय राऊत आणि माझं वैयक्तिक वैर नाही. सरकारमधील प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलेला नाही, असं पटोले म्हणाले. UPA च्या अध्यक्षपदावरुन संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झडलेली संपूर्ण राज्याने पाहिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी हे वक्तव्य केलंय.

‘लोकशाहीचा गळा घोटला जाऊ नये म्हणून राज्यपाल’

त्याचबरोबर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत बोलताना राज्यपालांनी हे प्रस्ताव पत्र दाबून ठेवलेलं आहे, असा या संपूर्ण प्रकरणाचा अर्थ निघतो, अशी टीकाही पटोले यांनी केलीय. तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याांनी कुठेही सांगितलं नाही की आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. लोकशाहीचा गळा घोटळा जाता कामा नये, यासाठी राज्यपालांची नियुक्ती असते. स्वत: राज्यपाल यात पुढाकार घेतील आणि कॅबिनेटने 12 आमदारांचा जो प्रस्ताव पाठवला आहे त्याला मान्यता देतील, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

‘मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या’, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

No dispute in the Mahavikas Aghadi government, said Nana Patole

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.