पवारांना आता कुणीच वाचवू शकत नाही, किरीट सोमय्या अजित पवारांच्या सहीचा कागद दाखवणार

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची तयारी केली आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

पवारांना आता कुणीच वाचवू शकत नाही, किरीट सोमय्या अजित पवारांच्या सहीचा कागद दाखवणार
अजित पवार, किरीट सोमय्या


मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची तयारी केली आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही.

किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे”

शरद पवारांनी उत्तर द्यावं

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये हिम्मत असली पाहिजे. शरद पवारांच्या रिमोटव्दारे घोटाळे होत आहेत, त्याचं उत्तर द्यावं. त्यांच्या स्टेटमेंटची किंमत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सेशन कोर्टापासून कुठल्याच कोर्टाने हात धरला नाही, त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात, असा हल्लाबोल सोमय्यांनी केला.

मां का बुलाया आया हैं, आर्थर रोड जेल जानाही पडेगा

अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईकांसाठीही उद्धव ठाकरे कोर्टात गेले, काय झालं? भावना गवळींच्या ट्रस्टमध्ये 22 कोटींचा घोटाळा झाला आहे. ठाकरे साहेबांना दिसत नाही. नेते घोटाळा करतात शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिसत नाही? भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. घरात 25 कोटी कॅश ठेवली, “अखेर तो मां का बुलाया आया हैं, आर्थर रोड जेल जानाही पडेगा..”, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.

आमच्यासाठी जो घोटाळा करेल तो टार्गेटवर असेल, असा इशारा सोमय्यांनी दिला.

VIDEO : किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या  

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांच्या इशाऱ्याने खळबळ

पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI