AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Property Tax : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मालमत्ता करातील दरवाढ 1 वर्ष पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Mumbai News : गेल्या वर्षी 2021मध्येही मुंबई पालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करातील वाढ एका वर्षासाठी स्थगित केली होती. मार्च 2021मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर याआधी 2015 साली मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली. त्यानंतर मुंबईत मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही.

Mumbai Property Tax : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मालमत्ता करातील दरवाढ 1 वर्ष पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई पालिका आणि मुख्यमंत्रीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 7:09 AM
Share

मुंबई : मुंबईकरांना (Mumbai Property Tax) दिलासादायक वृत्त आहे. मुंबईतील मालमत्ता करात किमान पुढचं एक वर्ष कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, हे आता स्पष्ट झालं. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी याबाबतची माहिती विधानसभेत बोलताना दिली. मालमत्ता करता दर पाच वर्षांनी वाढ करण्यात येते. ही वाढ पुढच एक वर्ष करु नये, अशा सूचना मुख्यमत्र्यांनी पालिका (BMC 2022) आयु्क्तांना दिल्या असल्याचं म्हटलंय. अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न घेऊन मागणी केली होती. ही मागणी मान्य करत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना मालमत्ता कर किमान पुढचं एक वर्ष जैसे थेच ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे मुंबईच्या मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ पुढे ढकलण्यात आलेली होती. ही वाढ या वर्षी करण्यात येणार होती. पण नियोजित वाढ पुढचं किमान एक वर्ष करु नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. ते गुरुवारी विधानसभेत बोलत होते.

पाहा विधानसभेतील एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भाषण

कुणी केली होती मागणी?

मुंबईतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. त्यात भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर, तर शिंदे गटातील सदा सरवणकर यांच्यासह यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, सुनिल राणे, दिलीप लांडे, प्राकश सुर्वे, अमित साटम या आमदारांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. मुंबईतील मालमत्ता करात 16 ते 20 टक्के वाढ करु नये, अशी मागणी या आमदारांनी केली होती. आमदारांनी केलेली मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी मालमत्ता करात वाढ न करण्याच्या सूचना दिल्यात.

सलग दुसऱ्यांना दिलासा…

गेल्या वर्षी 2021मध्येही मुंबई पालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करातील वाढ एका वर्षासाठी स्थगित केली होती. मार्च 2021मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर याआधी 2015 साली मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली. त्यानंतर मुंबईत मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही. 2020 साली ही वाढ करण्यात येण्याची शक्यता होती.

मात्र कोरोनामुळे ही दरवाढ पुढे ढकलली गेली. त्यानंतर 2021 साली 14 टक्के दरवाढ मालमत्ता करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला झालेल्या तीव्र विरोधामुळे ही दरवाढ स्थगित करण्यात आलेली. 2021 साली घेण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीच्या निर्णयामुळे पालिकेचं उत्त्पन्न तब्बल 1 हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. पण आता पुन्हा हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता, मालमत्ता कराचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा मानला जातोय.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.