Bhaskar Jadhav: ‘नॉट रिचेबल’ शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्ये परतले

बंड  केलेलं सर्व आमदार  गुहावटीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार याेगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुहावटीत आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव ही उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेनेत जाणार का? या चर्चेला उधाण आले होते.

Bhaskar Jadhav: 'नॉट रिचेबल' शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्ये परतले
Bhaskar jadhva
Image Credit source: Facebook
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 28, 2022 | 10:39 AM

रत्नागिरी- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंडखोरी करत बंड केलं, एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणारे आमदार नॉटरिचेबल होत शिंदे गटात सहभागी होताना दिसून आले आहे. यातच चिपळूणचे शिवसेना (Shivsena)आमदार कालपासून नॉट रिचेबल असल्याने तेही गुहावटीला गेले का काय? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवसेना आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) चिपळुणात परतल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांचा मुक्काम मुंबई होता. मी उद्धव ठाकरे यांच्य सोबतच असून मी शिवसेनेतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फोनला नेटवर्क प्रॉब्लेम आल्याने फोन नॉट रिचेबल असल्याचे सांगत त्यांनी नॉट रिचेबल नाट्यावर पडदा पडला आहे.

नॉट रिचेबल आल्याने चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होताना, एक -एक आमदार नॉट रिचेबल होताना दिसून येत आहे. यामध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. बंड  केलेलं सर्व आमदार  गुहावटीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार याेगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुहावटीत आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव ही उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेनेत जाणार का? या चर्चेला उधाण आले होते. त्याच कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने तर्कविर्तकांना ऊत आला होता. भास्कर जाधवही गुहावटीला गेल्याचे म्हटले जात होते.

मी शिवसेनेतच राहणार

शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरत येथे गेले तेव्हा आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. मात्र त्यानंतर ते मुंबईला आले. पुढे दोन -तीन दिवस मुंबईतच ते थांबले. त्यानंतर पुन्हा चिपळूणकडे येताना त्यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने तेही एकनाथ शिंदे याचा गोटात सामील झाले की काय अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र सद्यस्थितीला ते चिपळूनमध्ये कार्यकर्त्याच्या बैठका घेत आहेत. तसेच मी शिवसेनेत राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें