आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार: दरेकर

पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. | Pravin Darekar

आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार: दरेकर
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 4:48 PM

उस्मानाबाद: भाजप आता महाविकासआघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असे सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. (BJP leader Pravin Darekar slams Mahavika Aghadi govt)

प्रविण दरेकर यांनी शनिवारी उस्मानाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. चांगल्या गोष्टी असेल तर बदल झाला पाहिजे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भाजपचे इतर नेत्यांनीही सरकार बदलासंदर्भात बोलणे बंद केले तर ते चांगले ठरेल, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.

‘महाविकासआघाडी चकमकीत जिंकली, मुख्य लढाई अजून बाकी’

एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नसते. अजून खूप निवडणुका बाकी आहेत. छोट्यामोठ्या चकमकी होत असतात, त्यामध्ये महाविकासआघाडी जिंकली आहे. मात्र, अजून मुख्य लढाई बाकी आहे. जनतेने हैदराबादमध्ये काय कौल दिला, हे सर्वांसमोर आहे. भाजपच्या जागांमध्ये दसपटीने वाढ झाली आहे. मात्र, आम्ही विधानपरिषदेतील पराभवासंदर्भात जरुर आत्मचिंतन करु, असे दरेकर यांनी म्हटले.

‘महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी अंतर्गत संघर्ष’

महाविकास आघाडी एकत्र असली तरी त्यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे. पुढे काय होते ते पाहा? मोफत वीज प्रस्ताव मंजूर केला जात नसताना एसटीला शिवसेना मंत्री अनिल परब 1 हजार कोटींची पॅकेज मिळवतात. महाविकास आघाडीत पक्षांतर्गत कुरघोड्या आहेत. हे सरकार पूर्ण विसंवादाने भरलेले आहे. आचार-विचार पटत नसतानाही , इच्छा असो की नसो महाविकास आघाडी भाजपच्या भीतीने एकत्र असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी केला.

संबंधित बातम्या:

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, सतेज पाटलांचा खणखणीत टोला

येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला

(BJP leader Pravin Darekar slams Mahavika Aghadi govt)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.