AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला या अन् रोख पॅकेज मिळावा, रिकाम्या खुर्च्याची नामुष्की टाळण्यासाठी भुमरेंचा घुमजाव, आंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमा करावी असे आदेशच जणू संदीपान भुमरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी काहीही करा पण गर्दी झाली पाहिजे असा निर्धार मंत्री भुमरे यांनी केला आहे. यापूर्वीच्या सभेतील अनुभव हा विचित्र होता. शिवाय त्याची पुन्नरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला या अन् रोख पॅकेज मिळावा, रिकाम्या खुर्च्याची नामुष्की टाळण्यासाठी भुमरेंचा घुमजाव, आंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्याचे आदेश दिले गेले असल्याचा आरोप आंबादास दानवे यांनी केला आहे.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 10:47 PM
Share

मुंबई : मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर (Sandipan Bhumare) संदीपान भुमरे हे प्रथम आपल्या (Constituency) मतदार संघात दाखल झाले होते. त्यांचे जंगी स्वागत सोडा कार्यक्रमासाठी आणलेल्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या. आता 12 सप्टेंबर रोजी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा होत आहे. पुन्हा तीच नामुष्की ओढावू नये म्हणून पैसे देऊन सभेसाठी नागरिक जमवण्याचे आदेश दिले गेले असल्याचा खळबळजनक आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केला आहे.

आमक्याचे लग्न आणि तमकेच वऱ्हाडी

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमा करावी असे आदेशच जणू संदीपान भुमरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी काहीही करा पण गर्दी झाली पाहिजे असा निर्धार मंत्री भुमरे यांनी केला आहे. यापूर्वीच्या सभेतील अनुभव हा विचित्र होता. शिवाय त्याची पुन्नरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ज्यांचा संबंध नाही असेही नागरिक या सभेला उपस्थित राहू शकतात असे दानवे यांनी सांगितले आहे.

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची सभा

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची सभा पैठण येथे होत आहे. हा मतदारसंघ मंत्री संदीपान भुमरे यांचा आहे. या सभेच्या अनुषंगाने 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत. संदीपान भुमरे यांच्या सभेला गर्दी झाली नव्हती. तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जात आहे.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.