पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी

पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. (palghar lynching case: narayan rane demands CBI probe)

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 2:41 PM

मुंबई: पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे तडजोडवादी सरकार आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. (palghar lynching case: narayan rane demands CBI probe)

पालघर साधू हत्याकांडप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेऊन रॅली काढण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करत राम कदम यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली.

संघर्ष थांबणार नाही

राम कदम यांनीही जोपर्यंत पालघर हत्याकांडाचं प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असं स्पष्ट केलं. आज या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता संघर्षाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. या सरकारला साधूंचा आक्रोश ऐकू येत नाही. आम्हाला हा आक्रोश ऐकू येतोय. म्हणूनच ज्या ठिकाणी साधूंची हत्या झाली. त्या ठिकाणी दिवा पेटवून या साधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही जात होतो. तरीही आम्हाला मज्जाव करण्यात आला. दिवा पेटवणं हा काही गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच 212 दिवस झाले तरी सरकार या प्रकरणाचा न्याय करू शकली नाही. पोलीसही सरकारच्या दबावात आहेत. हे सरकार झोपलं आहे. त्यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली. आज संघर्ष सुरू झाला. आता रस्त्यावरचा संघर्ष करू. आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले हत्याकांडात मारलेल्या साधूच्या नावाने दिवा लावण्यासाठी जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गडचिंचले येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आमदार राम कदम आले असता पोलिसांनी त्यांना पालघरमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यामुळे मनोर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी यावेळी दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले होते.

संबंधित बातम्या:

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा ‘सामना’ रंगणार

(palghar lynching case: narayan rane demands CBI probe)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.