धनंजय मुंडे आघाडीवर, जेसीबीच्या फाळक्यावर बसून कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यातील हायप्रोफाईल लढतीपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात (Parali Assembly Election Result) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडे आघाडीवर, जेसीबीच्या फाळक्यावर बसून कार्यकर्त्यांचा जल्लोष


बीड : राज्यातील हायप्रोफाईल लढतीपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात (Parali Assembly Election Result) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून आता 13 व्या फेरीपर्यंत धनंजय मुंडे सातत्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आपला आनंद व्यक्त करत थेट जेसीबीच्या लोडरमध्ये बसून गुलाल उधळला आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या गटात निराशेचे वातावरण पसरले आहे. पंकजा मुंडे सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघ

एकुण मत मोजणी (15 वी फेरी) – 137811

धनंजय मुंडे – 78070

पंकजा मुंडे – 51875

धनंजय मुंडे यांना एकूण 26195 मतांची आघाडी

या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अस्तित्वाची लढाई लढत भाजपला जोरदार आव्हान दिलं. 2014 मध्ये बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार म्हणून जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. मात्र, यावेळी ते जयदत्त क्षीरसागरही शिवसेनेत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरच्या अडचणी वाढल्या होत्या. अशावेळी धनंजय मुंडे यांच्या आघाडीने राष्ट्रवादीने बीडमध्ये पुनरागमन केल्याची चर्चा आहे.

राज्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत म्हणून परळीच्या लढतीकडे पाहिलं जात होतं. पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात ही लढत झाली. धनंजय मुंडेंनी या निवडणुकीला अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना 25 हजार 895 मतांनी पराभूत केलं होतं. मात्र, यावेळी निकाल बदलल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टीपी मुंडे (TP Munde BJP) यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. टीपी मुंडे (TP Munde BJP) यांचा एक मुलगा प्रदीप मुंडे जिल्हा परिषद सदस्य, दुसरा मुलगा नगरसेवक आणि युवा काँग्रेसची नेता असलेल्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत टीपी मुंडे यांनीही भाजप प्रवेश केला होता. भाजपच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं.

टीपी मुंडे यांनी भाजपला पाठिंबा देणं हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला गेला होता. परळीच्या निवडणुकीत टीपी मुंडे यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतं मिळवलेली होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधातही टीपी मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. विशेषतः परळी शहरातील दरी भरुन काढण्यासाठी पंकजा मुंडेंना फायदा होणार असल्याचंही बोललं गेलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI