आधी अजित पवार, आता पार्थ आणि बाळा भेगडे यांची मतदाना दिवशी भेट

पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असताना एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुणे भाजप अध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांची मतदान केंद्रावर भेट झाली. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं, विचारपूस केली. शिवाय उपस्थितांना फोटोसाठी पोजही दिली. मावळ काही दिवसांपूर्वीच बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे […]

आधी अजित पवार, आता पार्थ आणि बाळा भेगडे यांची मतदाना दिवशी भेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असताना एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुणे भाजप अध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांची मतदान केंद्रावर भेट झाली. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं, विचारपूस केली. शिवाय उपस्थितांना फोटोसाठी पोजही दिली. मावळ

काही दिवसांपूर्वीच बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित होते. दोघांनी एकमेकांच्या कानात गुफ्तगू केल्याचे फोटो व्हायरल झाले आणि एकच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मावळमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण, मुलगा पार्थ पवारला या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी ते मावळमध्ये तळ ठोकून होते. अजित पवारांची भाजपच्या आमदारांशी जवळीक चर्चेचा विषय ठरली. भाजप आमदार बाळा भेगडे यांच्याशी एका कार्यक्रमात त्यांनी केलेली गुफ्तगू चर्चेचा विषय बनली होती. यावर बाळा भेगडेंनी स्पष्टीकरण देताना, बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितल्याचं ते म्हणाले होते. शिवाय मावळच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

मावळ येथील काणे फाटा येथे रवी भेगडे यांनी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावत तेथील स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणेंशी बोलणं टाळलं होतं. पण बारणेंना सोडून बाळा भेगडेंशी केलेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची भिस्त ही शिवसेनेपेक्षा जास्त भाजपवर अवलंबून आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे, त्या मतदारसंघातील भाजपच्या आमदारासोबत काय चर्चा केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित पवारांचा मुलगा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे हे भाजपचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असून तब्बल दहा वर्षे ते आमदार आहेत. त्यांचे मावळमध्ये प्राबल्य असल्यामुळे या भेटीविषयी चर्चा झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर आज मावळमध्ये पार्थ पवार आणि बाळा भेगडे यांची पुन्हा भेट झाल्याने चर्चा तर होणारच.

संबंधित बातम्या 

बाळा भेगडेंनी अजित पवारांच्या कानात सांगितलं, बारामती भाजपच जिंकणार

अजित पवार मावळमध्ये तळ ठोकून, भाजप आमदार बाळा भेगडेंशी गुफ्तगू 

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, हस्तांदोलन करुन सदिच्छा   

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.