AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election 2022: पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 25 बदलाची शक्यता; सत्तासंघर्ष नाट्याचा दिसणार परिणाम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे येथील आरक्षणामुळे जुन्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याकडेही राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

PCMC Election 2022: पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 25 बदलाची शक्यता; सत्तासंघर्ष नाट्याचा दिसणार परिणाम
| Updated on: Aug 19, 2022 | 5:27 PM
Share

पुणेः राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका (Municipal election 2022) जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आता राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या घटनेचा परिणाम स्थानीक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेवरही दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर त्याचा जर परिणाम झाल्याचे दिसून आले तर वावगे वाटणा नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणजे राष्ट्रवादीचा (Nationalist Congress) बालेकिल्ला समजला जातो. सध्या राज्यात सत्ताबदल झाल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार का याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 मध्ये शिवसेनेच्या अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, राहुल कलाटे तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे निवडून आले होते. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी होती.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष
त्यामुळे आता यावेळी राज्यात बंडखोरी नाट्य घडल्यामुळे शिवसेना पक्षाचीच शकले झाली आहेत, त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार की, आपापल्या पक्षाचे झेंडा घेऊन राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ते आता येणारा काळच ठरवणार आहे.
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष

आरक्षणाचा काय होणार परिणाम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे येथील आरक्षणामुळे जुन्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याकडेही राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाल्हेकर वाडी, गुरुद्वार, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती, हा परिसर येतो तर उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईन आहे.  पूर्व परिसरात अश्विनी हॉस्पिटल लगतच्या रेल्वे लाईन पासून दक्षिणेस ओम चौक बिजलीनगर व ओम चौकातून पश्चिमेस आकुर्डी चिखली स्पाईन रस्त्याच्या जनरल बिपिन रावत पुलापर्यंत व तिथून दक्षिणेस वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व रस्ता ओलांडून नाल्याने हॉटेल वाघिरे रानमाळ्यापर्यंत व त्या लगतच्या रस्त्याने दक्षिणेस पंपिंग स्टेशन ओलांडून पवना नदीपर्यंत आहे दक्षिण परिसरामध्ये पवना नदी तर पश्चिममध्ये रावेत बास्केट ब्रिज पवना नदीपासून उत्तरेस औंध रावेत बी आर टी रस्ता ओलांडून पाईपलाईन रोडने राजलक्ष्मी ग्रीन्स जवळील नाल्याच्या रेल्वे लाईन पर्यंत हा परिसर पसरलेला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.