AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील: राऊत

कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. | Sanjay Raut PM Modi tauktae cyclone

नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील: राऊत
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Updated on: May 20, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला 1000 कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. (PM Narendra Modi should give 1500 crores aid to Maharashtra for damage in tauktae cyclone)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल

सद्यपरिस्थितीत पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज, वादळात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख; मोदींची मोठी घोषणा

उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत, हे आता मोदींनाही पटलं असावं: संजय राऊत

महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल

(PM Narendra Modi should give 1500 crores aid to Maharashtra for damage in tauktae cyclone)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.