PM Narendra Modi : Article 370 वरुन पीएम नरेंद्र मोदी विदर्भात कडाडले, थेट काँग्रेसला उद्देशून म्हणाले….

PM Narendra Modi : "नक्षलवादामध्ये अनेक युवकांच आयुष्य बरबाद झालं. हिंसाचाराचा खेळ सुरु राहिला. औद्योगिक शक्यता मावळल्या काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूनी खेळ दिलाय. आमचं सरकार ज्यांनी नक्षलवादाला लगाम लावली. आज संपूर्ण क्षेत्र मोकळा श्वास घेतय" असं पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : Article 370 वरुन पीएम नरेंद्र मोदी विदर्भात कडाडले, थेट काँग्रेसला उद्देशून म्हणाले....
नरेंद्र मोदी, पंतप्रधानImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 1:56 PM

“तुम्ही महाष्ट्राच्या प्रगतीला ब्रेक लागू द्याल का? काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष हिंसा आणि फुटीरतवादाच राजकारण करतात. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत जे झालं ते देशाने पाहिलं. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल. हे जम्मू-काश्मीर अनेक दशकं फुटीरतावाद आणि दहशतवादात जळत होतं. महाराष्ट्राचे अनेक वीर जीवन मातृभूमीच्या रक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले. ही परिस्थिती कशी निर्माण झाली? ज्या कायद्याच्या आडून, ज्या कलमाच्या आडून हे सर्व झालं, ते कलम होतं 370 आणि 370 कलम काँग्रेसची देन होती. आम्ही 370 कलम संपवलं आणि काश्मीरच भारत, भारतीय संविधानाशी नातं जोडलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते चिमूर येथील सभेत बोलत होते.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान बनवलं, ते संविधान सगळ्या देशाने स्वीकारलं, लागू केलं. पण तुम्हाला हे समजल्यावर दु:ख होईल, संविधानाची माळ जपणाऱ्या लोकांनी, सात दशकापासून जास्त काळ जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच संविधान लागू केलं नव्हतं” अशी टीका पीएम मोदी यांनी काँग्रेसवर केली. “सात दशकं देश स्वतंत्र होता. जो पर्यत मोदी आला नाही, तो पर्यंत या देशात दोन संविधान चालत होती. जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाचा जज, तिथला मुख्यमंत्री भारतीय संविधानानुसार शपथ घेत नव्हता, कारण, 370 ची भिंत होती” असं पीएम मोदी म्हणाले.

‘ही गोष्ट पचत नाहीय’

“तुम्ही मोदीला आशिर्वाद दिलात आणि 370 ला कायमसाठी आम्ही जमिनीत गाडून टाकलं. पण काँग्रेसवाल्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट पचत नाहीय. म्हणून काँग्रस आणि त्यांचे सहकाऱ्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा 370 आणण्याचा प्रस्ताव सभागृहात आणला. सभागृहात मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहेत” असा आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला.

‘काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूनी खेळ दिलाय’

“जम्मू-काश्मीरमध्ये भारताच संविधान पोहोचलं. हे लोक ते काम करतायत जे पाकिस्तानला हवं आहे. काँग्रेसला हे तुम्ही करु द्याल का? 370 पुन्हा येऊ द्याल का? जम्मू-काश्मीरला आपल्यापासून लांब ठेवाल का?” असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले. “चंदपूरच्या या क्षेत्राने नक्षलवादाची झळ सोसलीय. या क्षेत्राने खूप सहन केलय. नक्षलवादामध्ये अनेक युवकांच आयुष्य बरबाद झालं. हिंसाचाराचा खेळ सुरु राहिला. औद्योगिक शक्यता मावळल्या काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूनी खेळ दिलाय. आमचं सरकार ज्यांनी नक्षलवादाला लगाम लावली. आज संपूर्ण क्षेत्र मोकळा श्वास घेतय. चिमूर आणि गडचिरोली क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रात नक्षलवाद पुन्हा हावी होऊ नये, यासाठी तुम्ही काँग्रेस आणि त्याच्या साथीदारांना इथे भटकू देऊ नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.