महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा

सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. (Prakash Ambedkar On MPSC Exam Postpone)

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 5:59 PM

नवी दिल्ली : “MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. (Prakash Ambedkar On MPSC Exam Postpone)

महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करतो. शेतकरी कृषी बिलवर महाराष्ट्र सरकारने कायदा लागू होऊ देणार नाही असे म्हणतो. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

“मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला.

“महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करतयं”

“मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने  विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

“वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्र मध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे,” असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

“सरकार निष्फळ ठरलं आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी विधेयकाने शेतकऱ्याला काहीही फायदा मिळणार नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. (Prakash Ambedkar On MPSC Exam Postpone)

संबंधित बातम्या : 

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, पहिले सम्राट अशोक : प्रकाश आंबेडकर

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.