अमोल कोल्हेंनी विचारधारा बदली की ‘राष्ट्रवादी’ गोडसेचे समर्थन करते?; युवक काँग्रेसचा सवाल

अमोल कोल्हेंनी विचारधारा बदली की 'राष्ट्रवादी' गोडसेचे समर्थन करते?; युवक काँग्रेसचा सवाल
अमोल कोल्हे

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात  नथुराम गोडसे याची भूमिका केली आहे. या भूमिकेवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने देखील अमोल कोल्हे यांचा निषेध करण्यात आला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 22, 2022 | 9:32 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe)  यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात  नथुराम गोडसे (Nathuram Godse) याची भूमिका केली आहे. या भूमिकेवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. गांधी समर्थकांकडून अमोल कोल्हे यांचा निषेध  करण्यात येत आहे. आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या (Youth Congress) वतीने देखील अमोल कोल्हे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या वादात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उडी घेतल्याचे पहायाल मिळत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून तर अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचे समर्थन देखील करण्यात आले. कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची केवळ भूमिका केली आहे. भूमिका करणे म्हणजे विचारांना समर्थ होत नसल्याचा युक्तीवाद देखील मांडला जात आहे.

काय म्हणाले कुणाला राऊत ?

एकीकडे अमोल कोल्हे यांचे काही जण समर्थन करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे  युवक काँग्रेसच्या वतीने अमोल कोल्हे यांचा ही भूमिका केल्याबद्दल निषेध करण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाला राऊत यांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे की, कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यामुळे महात्मा गांधी समर्थक आणि  काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने या भूमिकेबद्दल मी खासदार कोल्हे यांचा निषेध करतो. अमोल कोल्हे यांनी आपली विचारधार बदलली आहे की, राष्ट्रवादी हा पक्ष गोडसेच्या विचारांचा झाला आहे. याचे स्पष्टीकरण कोल्हे यांनी द्यावे  असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

नेमका वाद काय?

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात  नथुराम गोडसे याची भूमिका केली आहे. या भूमिकेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर अमोल केल्हे यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्ये झाले होते. मात्र हा चित्रपट तब्बल पाच वर्षांनी म्हणजे आता प्रदर्शीत होत असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. मी फक्त चित्रपटात नथुराम याची भूमिका केली, मात्र मी कोणत्याही प्रकारे त्या विचारधारेचे समर्थन करत नसल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

घोडेबाजार करता येत नसल्याचं भाजपला दुःख होतंय, असं जयंत पाटील का म्हणाले?

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?

पुन्हा “मोदी”वरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें