AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : प्रभाग अकरा भाजपाचा की काँग्रेस-राष्ट्रवादीचा? वाचा, आरक्षणानुसार बदललेली वॉर्डरचना आणि उमेदवार

2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 हा रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर याठिकाणच्या पॅनेलवर नजर टाकल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व याठिकाणी दिसून आले. यावेळी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बोपोडी-पुणे विद्यापीठ परिसर येणार आहे.

PMC election 2022 : प्रभाग अकरा भाजपाचा की काँग्रेस-राष्ट्रवादीचा? वाचा, आरक्षणानुसार बदललेली वॉर्डरचना आणि उमेदवार
पुणे महापालिका, वॉर्ड 11Image Credit source: tv9
| Updated on: Jun 17, 2022 | 1:53 PM
Share

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची (PMC election 2022) रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत या पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया मे महिन्यात पार पडली. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी यावेळी मतदान पार पडणार आहे. मागीलवेळी प्रभागरचना बदलली होती. चार नगरसेवकांचे पॅनल प्रत्येक प्रभागात होते. 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 हा रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर याठिकाणच्या पॅनेलवर नजर टाकल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व याठिकाणी दिसून आले. यावेळी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बोपोडी-पुणे विद्यापीठ परिसर येणार आहे. भाजपाचे वर्चस्व याठिकाणी मागील वेळी दिसून आले होते.

अशी रंगली लढत

– प्रभाग अकराच्या अ मध्ये संतोष सिताराम अमराळे (भाजपा), अनिल गणपत घोलप (शिवसेना) तर दीपक मानकर (राष्ट्रवादी) यांच्यात लढत पाहायला मिळाली.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाअनिल गणपत घोलप--
भाजपासिताराम अमराळे--
काँग्रेस----
राष्ट्रवादीदीपक मानकरदीपक मानकर
मनसे----
इतर----

– प्रभाग अकराच्या ब मध्ये आशा राजू भगत (अपक्ष), वृषाली साधू धुमाळ (मनसे), अश्निनी जाधव (राष्ट्रवादी), छाया अजय मारणे (भाजपा), सविता सुहास मते (शिवसेना) यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासविता सुहास मते--
भाजपाछाया अजय मारणेछाया अजय मारणे
काँग्रेस----
राष्ट्रवादीअश्निनी जाधव--
मनसेवृषाली साधू धुमाळ--
इतरआशा राजू भगत--

– प्रभाग अकराच्या क मध्ये अर्चना सागर भगत (अपक्ष), मनिषा संदीप बुटाला (भाजपा), सुजाता शिवदास करवंदे (अपक्ष), वैशाली राजेंद्र मराठे (काँग्रेस), शर्मिला नितीन शिंदे (शिवसेना), स्नेहन गणेश शिंदे (मनसे) यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाशर्मिला नितीन शिंदे--
भाजपामनिषा संदीप बुटाला--
काँग्रेसवैशाली राजेंद्र मराठेवैशाली राजेंद्र मराठे
राष्ट्रवादी----
मनसेस्नेहन गणेश शिंदे--
इतरअर्चना सागर भगत--
– प्रभाग अकराच्या ड मध्ये सुहास पोपट गजरमल (अपक्ष), मयूर लघू घारे (रासप), संदीप ज्ञानोबा जोरी (मनसे), अॅड. रामचंद्र आत्माराम कदम (काँग्रेस), रवींद्र धोंडिबा मानकर (अपक्ष), जयदीप पडवळ (शिवसेना)
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाजयदीप पडवळ--
भाजपा----
काँग्रेसअॅड. रामचंद्र आत्माराम कदमअॅड. रामचंद्र आत्माराम कदम
राष्ट्रवादी----
मनसेसंदीप ज्ञानोबा जोरी--
इतररवींद्र धोंडिबा मानकर--

विजयी उमेदवार कोण?

रामबाग कॉलनी-शीवतीर्थ नगर या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दीपक मानकर अ मधून, भाजपाच्या छाया अजय मारणे ब मधून, वैशाली राजेंद्र मराठे या विभाग क मधून काँग्रेसतर्फे तर अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ आत्माराम कदम हे ड मधून काँग्रेसतर्फे निवडून आलेले उमेदवार आहेत.

प्रभाग क्र. 11, प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे – बोपोडी-पुणे विद्यापीठ (2022)

बोपोडी गावठाण, प्रगतीनगर, चेतक सोसायटी, नाईक चाळ, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, कर्मवीर सोसायटी, मिथिलानगरी, भीमज्योतनगर, यशवंत सोसायटी, मॉडेल कॉलनी, लक्ष्मीनगर सोसायटी इ.

आरक्षण कसे? (2022)

यावेळी बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा प्रभाग जागा क्रमांक 11 अ हा अनुसूचित जाती (महिला), ब हा सर्वसाधारण महिला तर क सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.