AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं चित्र संसदेत बऱ्याच वर्षानंतर दिसलं, मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर येताच… काय घडलं असं?

नव्या संसदेत आज अत्यंत आश्वासक घटना घडली. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी समोरासमोर आले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केलं. आणि लोकसभा अ्ध्यक्षांना त्यांच्या खुर्चीपर्यंत नेलं. हे चित्र अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक होतं. नेमकं काय घडलं होतं सभागृहात?

असं चित्र संसदेत बऱ्याच वर्षानंतर दिसलं, मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर येताच... काय घडलं असं?
PM Modi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2024 | 1:34 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तवही जात नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर तुटून पडत होते तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा भाजपवर तुटून पडत होते. त्या आधी संसदेतही राहुल गांधी आणि मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या. गेल्या दहा वर्षात हे दोन्ही नेते संसदेत हास्यविनोद करताना कधीच दिसले नाही. पण आजचा प्रसंग काही खास होता. आज हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले. स्मितहास्य केलं आणि हस्तांदोलनही केलं. बऱ्याच वर्षानंतर संसदेत हे चित्र पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून इतर खासदारांचेही चेहरे फुललेले दिसले.

आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती. यावेळी एनडीएन ओम बिर्ला यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर इंडिया आघाडीने सुरेश यांना उमेदवारी दिली होती. यावेळी ध्वनिमत घेण्यात आलं. त्यात ओम बिर्ला हे विजयी झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले. यावेळी मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत स्मित हास्य केलं. दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा सर्वच खासदार भारावून गेले. खासदारांनी टाळ्या वाजवून दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ओम बिर्ला यांना सन्मानाने अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेलं. हे चित्र लोकसभेसाठी अत्यंत अनोखं असं होतं.

खूप काही शिकायला मिळेल

ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तुम्हाला दुसऱ्यांदा या पदावर बसायला मिळालं ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. सभागृहाच्यावतीने मी तुमचं अभिनंदन करतो. पुढील पाच वर्ष आम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुमच्याकडून तरुण आणि नवीन खासदारांना खूप काही शिकायला मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरचं प्रेमळ हास्य या सभागृहाचा आनंद द्विगुणीत करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तुमचा उल्लेख जरुर होईल

खासदार म्हणून तुमची कामाची पद्धत सर्वच खासदारांना शिकण्यासारखी आहे. तुम्ही निरोगी बाळ, निरोगी माता हे अभियान सुरू केलं. ते प्रेरणादायी आहे. तुम्ही गावागावात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं काम केलं आहे. गरिबांना कांबळ, कपडे, चपला, बुट, छत्री अशा अनेक सुविधा तुम्ही पुरवल्या आहेत. 17 व्या लोकसभेचा संसदीय इतिहास हा सुवर्णाक्षरात लिहावा असा होता. तुमच्या माध्यमातून जे निर्णय जाले, सभागृहाच्या माध्यमातून ज्या सुधारण्या झाल्या, त्या तुमच्या आणि सभागृहाच्या वारसा आहेत. जेव्हा भविष्यात संसदेच्या कामकाजाचं विश्लेषण केलं जाईल, तेव्हा तुमच्या अध्यक्षतेखालील लोकसभेचा जरुर उल्लेख होईल, असे गौरवोद्गार मोदींनी काढले.

आमचा आवाज दाबणार नाहीत

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षाला सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकारकडे पॉलिटिक्स पॉवर अधिक आहे. पण विरोधकही भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. आम्हाला आवाज उठवण्यास तुम्ही मोकळीक द्याल याची अपेक्षा आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबणं लोकशाही विरोधी आहे. तुम्ही विरोधी पक्षाला मदत कराल याची अपेक्षा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.