AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनसेला जबर हादरा, राज ठाकरेंचा लगेच मोठा निर्णय, महत्त्वाचा आदेश काढला!

मनसे या पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी चालू केलेली असताना दुसरीकडे नेतेमंडळीही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत. काही पदाधिकारी, नेते पक्षविरोधी कारवाया करताना दिसत आहेत. मनसे पक्षातही काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे.

मोठी बातमी! मनसेला जबर हादरा, राज ठाकरेंचा लगेच मोठा निर्णय, महत्त्वाचा आदेश काढला!
raj thackeray
| Updated on: Aug 25, 2025 | 2:37 PM
Share

MNS Raj Thackeray : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता राजकीय पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पादाधिकाऱ्यांना प्रचाराचं काम चालू करा असे आदेश दिले आहेत. मनसे या पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी चालू केलेली असताना दुसरीकडे नेतेमंडळीही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत. काही पदाधिकारी, नेते पक्षविरोधी कारवाया करताना दिसत आहेत. मनसे पक्षातही काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बडतर्फीचा आदेश

पक्षाच्या या कारवाईबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांचीही नावे आहेत. हा आदेश जारी करताना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून कोकणात राज ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसेचे कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यांनी नुकतेच मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. हीच बाब लक्षात घेता मनसेने खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोबतच अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज टाकरे यांच्या आदेशानुसार तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे, असे कारण या पत्रात देण्यात आले आहे.

वैभव खेडेकर भाजपात जाणार? मनसेला काय फटका बसणार?

वैभव खेडेकर हे कोकणातील चर्चेत असेलेले नाव आहे. कधिकाळी ते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी मनसेच्या तिकिटावर 2014 साली दापोली मतदारंसघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. खेड नगरपरिषद निवडणून आणण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी खेडचे नगराध्यक्षपदही भूषवलेले आहे. त्यामुळे खेडेकर हे थेट भाजपात जाणार असल्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी मनसेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तोटा मनसे आता कसा भरून काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.