कार्यकर्ते म्हणाले ‘आमचे सोडून सगळ्यांचे होर्डिंग्स लागतात’, मग राज ठाकरेंचं उत्तर काय?

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जागोजागी होर्डिंग्स लावून जंगी स्वागत केलं. यावरुन नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय चांगलेच तापले. पांडेय यांनी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केल्याची माहिती मिळेतय. दरम्यान, आज पत्रकारांनी याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच प्रश्न विचारला. त्यावेळी राज यांनीही खास उत्तर दिलं.

कार्यकर्ते म्हणाले 'आमचे सोडून सगळ्यांचे होर्डिंग्स लागतात', मग राज ठाकरेंचं उत्तर काय?
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष


नाशिक : राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी मनसे कार्यकर्ते आणि नाशिक पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जागोजागी होर्डिंग्स लावून जंगी स्वागत केलं. यावरुन नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय चांगलेच तापले. पांडेय यांनी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केल्याची माहिती मिळेतय. दरम्यान, आज पत्रकारांनी याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच प्रश्न विचारला. त्यावेळी राज यांनीही खास उत्तर दिलं. (Raj Thackeray’s reaction on the dispute between Nashik Police and MNS workers over hoardings)

‘होर्डिंग लावणं अयोग्यच आहे. शहर विद्रुप दिसतं. मीच सांगितलं होतं की होर्डिंग लावू नका. पण आमचे लोक म्हणाले, आमचे सोडून बाकीच्यांचे लागतात. मग मी म्हटलं करा काय करायचं ते’, असं आपण सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले.

नाशिक पोलिस, मनसे कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी

नाशिकमध्ये राज ठाकरे येणार म्हणल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राज यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावले. मात्र, त्यासाठी कुठलिही परवानगी घेतली नव्हते. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तिथेही होर्डिंग्ज लावले आहेत. हे होर्डिंग्ज काढण्यासाठी पथक पोहचले. तेव्हा या पथकातील अधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे पोलिसांनी गर्दी करणे, घोषणाबाजी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा केला. अधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज हटवल्यानंतर पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज लावले आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळीच पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील नवीन नियमांची माहिती त्यांना दिली. नाशिकमध्ये कोणताही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना होर्डिंग्ज लावण्यास मनाई आहे. नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करू. अनधिकृत होर्डिंग्जबाबत मनसेच्या जिल्हाअध्यक्षांशी बोलू, असे पांडेय यांनी सागितले आहे.

पोलिस आयुक्त काय म्हणाले?

पोलिस आयुक्त दीपक पांडेय होर्डिंग्ज प्रकरणावरून चांगलेच तापले आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास पक्षाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करू. आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याबाबत जाब विचारणार आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. कायदा सगळ्या पक्षांसाठी समान आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला समोर जावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘मतदारांनी एका वेळी किती बोटं दाबायची?’

राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्र सोडलं आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहेय कायदे वेगवेगळे का ? 2, 3, 4 प्रभाग हा खेळ कसला? उद्या 2-2 आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

इतर बातम्या :

प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार, अजितदादांचं जशास तसं प्रत्युत्तर

लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray’s reaction on the dispute between Nashik Police and MNS workers over hoardings

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI