गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Nov 05, 2019 | 11:31 PM

शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे.

गावंच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामे कशाला हवेत? : राजू शेट्टी
Follow us

जालना: राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपून काढले आहे. यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी मोडून पडला आहे. मात्र, शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) केला आहे. तसेच गावच्या गावं उद्ध्वस्त झालेले असताना पंचनामा कशाला हवा, असा सवालही त्यांनी (Raju Shetti on rain affected Farmer) उपस्थित केला. ते जालन्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते.

राजू शेट्टी मागील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. खर तर संपूर्ण शिवारासह गावच्या गावं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. अशावेळी पंचनामे कशासाठी मागतात, असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. प्रशासनही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसून सरकारही लक्ष देत नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

शेतकरी मोडून पडलेला असताना मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट : राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, “मागील 8 दिवस शासनाने पंचनामे सूरू करण्याचे आदेश दिल्याचं प्रशासन सांगत आहे. मात्र, अजूनही या गावात पंचनामे झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. मकाला कोंब फुटले आहेत, कापूस सडून चालला आहे. सर्वच पिकांची परिस्थिती अशीच आहे. रब्बीतील ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं असून यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. असं असताना विमा कंपनी नखरे करत असून वेगवेगळी कागदपत्रे, प्रस्ताव यातच शेतकऱ्यांना गुंतवत आहे.”

शेतकरी मोडून पडला असून त्याला आधारची गरज आहे. सरकारची ती जबाबदारी आहे, पण महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्वात नाही. मग कोण आधार देणार? शेतकऱ्याला आधाराची गरज असताना हे मुंबईमध्ये सत्तेचा सारीपाट करत बसले आहेत हे खरं दुर्दैव आहे, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI